टेंभू योजनेच्या चौथ्या टप्प्याची यशस्वी चाचणी : बळीराजा सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:32 AM2018-11-17T00:32:12+5:302018-11-17T00:33:55+5:30
खानापूर तालुक्यातील दुष्काळी देवीखिंडी, लेंगरे परिसराला वरदान ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी टेंभू जलसिंचन योजनेच्या चौथ्या टप्प्याची चाचणी गुरूवारी यशस्वी झाली. चौथ्या टप्प्यातील विद्युत पंपाद्वारे कृष्णेचे पाणी कालव्यातून लेंगरे तलावाकडे प्रवास करू लागताच
विटा : खानापूर तालुक्यातील दुष्काळी देवीखिंडी, लेंगरे परिसराला वरदान ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी टेंभू जलसिंचन योजनेच्या चौथ्या टप्प्याची चाचणी गुरूवारी यशस्वी झाली. चौथ्या टप्प्यातील विद्युत पंपाद्वारे कृष्णेचे पाणी कालव्यातून लेंगरे तलावाकडे प्रवास करू लागताच शेतकºयांनी जल्लोष केला.
आमदार अनिल बाबर व जि. प. उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यासह टेंभू अधिकाºयांच्या उपस्थितीत या चौथ्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाल्याने दुष्काळी भागातील बळीराजा सुखावला आहे.
टेंभू योजनेच्या देवीखिंडी येथील चौथ्या टप्प्याचे काम अपवाद वगळता पूर्ण झाले आहे. घाणंद कालव्यातून भरण कालव्याद्वारे टेंभूचे पाणी देवीखिंडी येथील टप्पा क्र. ४ मध्ये सोडण्यात आले आहे. तेथून हे पाणी भूड येथील पाचव्या टप्प्यात जाणार आहे. यादरम्यान लेंगरे तलावात टेंभूचे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवारी चौथ्या टप्प्यातील एक पंप सुरू करण्यात आला होता. परंतु, गळती असल्याने पंप बंद करून रात्री उशिरापर्यंत गळती काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
गुरूवारी आ. बाबर व उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या उपस्थितीत चौथ्या टप्प्याची चाचणी घेण्यात आली. ती पूर्णपणे यशस्वी झाली. त्यामुळे कृष्णामाईने लेंगरे तलावाच्या बाजूने प्रवास सुरू केला.
रात्री उशिरा टेंभूचे पाणी लेंगरे तलावात दाखल होईल. टेंभूच्या चौथ्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाल्याचे समजताच लेंगरे, जोंधळखिंडी, देवीखिंडी, भूड, वाळूज परिसरातील शेतकºयांनी कालव्यावर गर्दी करून जल्लोष केला.
मुख्यमंत्र्यांच्याहस्ते लवकरच उद्घाटन...
दुष्काळी भागात टेंभूचे पाणी आल्याने शेतकºयांच्या चेहºयावरचा आनंद हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. टेंभू योजनेच्या चौथ्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाली आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते टेंभू योजनेच्या या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे आ. अनिल बाबर यावेळी बोलताना म्हणाले.