ऑनलाईन कुस्ती मैदानात सांगलीचा सुदेश ठाकूर विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:07 AM2021-01-13T05:07:09+5:302021-01-13T05:07:09+5:30
कोकरुड : तुरुकवाडी (ता. शाहूवाडी) येथील शाळेच्या पटंगावर ‘कुस्ती हेच जीवन’ महासंघाच्या वतीने आयोजित राज्यातील पहिल्या अधिकृत ऑनलाईन कुस्ती ...
कोकरुड : तुरुकवाडी (ता. शाहूवाडी) येथील शाळेच्या पटंगावर ‘कुस्ती हेच जीवन’ महासंघाच्या वतीने आयोजित राज्यातील पहिल्या अधिकृत ऑनलाईन कुस्ती मैदान पार पडले. प्रथम क्रमाकांच्या कुस्तीत सांगलीच्या सुदेश ठाकूर याने मांगरूळच्या विकास पाटील याच्यावर पहिला गुण घेत मात केली.
दुसऱ्या लढतीत अजित पाटील (कोल्हापूर) याने उदय खांडेकर (वारणानगर) याचा पहिला गुण घेत पराभव केला. तिसऱ्या लढतीत अमर पाटील (कोल्हापूर) याने प्रदीप ठाकूर (सांगली) यास छडीटांग डावाने चितपट केले. चाैथ्या क्रमाकांच्या कुस्तीत संदीप बंडगर याने तात्या इंगळे यास दुहेरी पट काढत १३ व्या मिनिटाला चितपट केले. पाचव्या क्रमाकांच्या लढतीत सौरभ सव्वाशे (पुणे) याने विनायक जोग (इचलकरंजी) याच्यावर ढाक डावाने विजय मिळवला.
मैदानातील इतर विजयी मल्लांमध्ये ओमकार जाधव, विकी थोरात, विकास मोरबाळे, सूरज पाटील, विवेक लाड, नेताजी भोसले, आदित्य नायकवडी, अनिरुद्ध शिंदे, नयन माईगडे, साहील पाटील, यशराज खबाले, प्रतीक शिंदे, राजवर्धन पाटील, संकेत नेर्लेकर, ओमकार पाटील, अजिंक्य गायकवाड, विनय पाटील यांचा समावेश आहे.
कुस्ती मैदानाचे पूजन रामदास देसाई, मनोज मस्के, अशोक सावंत, शरद पाटील, हंबीरराव पाटील यांच्याहस्ते झाले. पंच म्हणून बाजीराव पाटील, विश्वास माईगडे, बाजीराव कलंत्रे, रंगराव पाटील, पांडुरंग पाटील यांनी काम पाहिले. सुरेश जाधव चिंचोलीकर यांनी समालोचन केले. मतीन शेख, फिरोज मुलानी, पांडुरंग पाटील, सुरेश जाधव, मनोज मस्के यांना ‘कुस्ती रत्न’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. अनिल पाटील, अशोक पाटील, महादेव मोरे, संपत पाटील, दत्ता पाटील, संग्राम देसाई, दगडू माईगडे, बाबाजी पाटील, भगवान पाटील यांनी मैदानाचे संयोजन केले.
यावेळी आनंदराव माईगडे, हंबीरराव पाटील, सर्जेराव पाटील, बंडा पाटील-रेठरेकर, राम सारंग, शिवाजी लाड, जालिंदर पाटील, राहुल जाधव, सुरेश जाधव, विकासराव पाटील, तानाजी चवरे, विकास शिरसट आदी उपस्थित होते.
फोटो-११कोकरुड४
फोटो ओळ : तुरुकवाडी (ता. शाहूवाडी) कुस्ती मैदानात आनंदराव माईगडे यांच्याहस्ते प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. यावेळी सर्जेराव पाटील, बंडा पाटील, मनोज मस्के, शरद पाटील, सुरेश जाधव, प्रताप कदम उपस्थित होते.