मागेल त्याला शिवभोजनाची सुधीर गाडगीळ यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:26 AM2021-04-17T04:26:17+5:302021-04-17T04:26:17+5:30
सांगली : शिवभोजन केंद्रावर सध्या १५० नागरिकांना जेवणाचा लाभ घेता येतो. ही मर्यादा वाढवून मागेल त्याला शिवभोजन मिळावे, अशी ...
सांगली : शिवभोजन केंद्रावर सध्या १५० नागरिकांना जेवणाचा लाभ घेता येतो. ही मर्यादा वाढवून मागेल त्याला शिवभोजन मिळावे, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना तसे निवेदन दिले.
त्यांनी सांगितले की, गोरगरीब जनतेसाठी कोरोना काळात शिवभोजन थाळीमुळे आधार मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद असलेल्या कामगार वर्गाला दिवसातून किमान एकदा तरी जेवण मिळायला हवे. शिवभोजन केंद्रावर त्यांची सोय होऊ शकते; पण तेथील थाळ्यांची मर्यादा १५० इतकीच आहे. १५ दिवसांच्या ब्रेक द चेन काळात शिवभोजनाचा लाभ सर्वांना मिळायला हवा. त्यासाठी शिवभोजन केंद्रांच्या मर्यादेत वाढ करायला हवी. मागेल त्याला शिवभोजन सरकारने द्यावे.
निवेदन देण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक संजय यमगर, राजेंद्र कुंभार, अश्रफ वानकर, अतुल माने, महेश सागरे, रघुनाथ सरगर आदी उपस्थित होते.