सुजाता कुलकर्णी यांची नागपूर विद्यापीठाच्या समितीवर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:25 AM2021-03-26T04:25:58+5:302021-03-26T04:25:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्याशाखेच्या शैक्षणिक अंकेक्षण समितीवर सांगलीच्या डॉ. सुजाता कुलकर्णी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्याशाखेच्या शैक्षणिक अंकेक्षण समितीवर सांगलीच्या डॉ. सुजाता कुलकर्णी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सुजाता कुलकर्णी या विलिंग्डन महाविद्यालयात संख्याशास्त्र विभागात गेली ३५ वर्षे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्या आखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या महाराष्ट्र प्रांताच्या उपाध्यक्ष म्हणून, शिवाजी विद्यापीठ शैक्षणिक संघाच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्सच्या संख्याशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून अभ्यास मंडळावरील बहिस्थ सदस्य म्हणूनही काम करतात.
त्यांच्या वाटचालीत आखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष प्रदीप खेडकर, प्रांत मार्गदर्शक शेखर चंद्रात्रे, ए. पी. कुलकर्णी, प्रभू देशपांडे, प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांचे तसेच माजी आमदार भगवानराव साळुंखे यांचे मार्गदर्शन मिळाले.