जत तालुक्यात चिंच उत्पादकांना उन्हाळी बोनस : दराचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:39 AM2018-03-13T00:39:27+5:302018-03-13T00:39:27+5:30

संख : चवीने आंबट असणारी चिंच यंदा दुष्काळी जत तालुक्यातील शेतकºयांना ‘गोड’ धक्का देण्याची चिन्हे दिसत आहेत. अनुकूल पावसामुळे दुष्काळी भागात चिंचा बहरल्या आहेत.

Summer bonuses for tasteless growers in Jat taluka | जत तालुक्यात चिंच उत्पादकांना उन्हाळी बोनस : दराचा गोडवा

जत तालुक्यात चिंच उत्पादकांना उन्हाळी बोनस : दराचा गोडवा

Next
ठळक मुद्देदर्जानुसार किलोला ५0 ते ७0 रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता; यंदा आशादायक चित्र

गजानन पाटील ।

संख : चवीने आंबट असणारी चिंच यंदा दुष्काळी जत तालुक्यातील शेतकºयांना ‘गोड’ धक्का देण्याची चिन्हे दिसत आहेत. अनुकूल पावसामुळे दुष्काळी भागात चिंचा बहरल्या आहेत. दुष्काळी भागात विनाखर्च व रोगाची शक्यता सर्वात कमी असलेल्या या चिंचेला यंदा पावसाचे पाणी योग्यवेळी मिळाल्याने अपेक्षेपेक्षा चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये काढणीला येणाºया चिंचा छोट्या-मोठ्या उत्पादकांना चांगला ‘उन्हाळी बोनस’ देतील, अशी अपेक्षा उत्पादकांतून व्यक्त होत आहे.

 भारतात सर्वत्र आढळणाºया चिंचांची लागवड महाराष्टÑातही सर्वत्र पाहावयास मिळते. तालुक्यातील शेतीच्या बांधावर, पाटालगत, ओढ्यालगत चिंचेच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. शासनाकडून व सामाजिक वनीकरण विभागाकडून रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी चिंचेच्या झाडांनाच प्राधान्य दिल्याचेही पाहावयास मिळते. मागील काही वर्षांपासून प्रयोगशील शेतकरी चिंचेची शेतीही करू लागले आहेत. त्यामुळे लहान व मोठे चिंचेचे उत्पादक या भागात आहेत. गतवर्षी जुलै ते सप्टेंबरपर्यंत पावसाने समाधानकारक दमदार हजेरी लावली. जून, जुलै महिन्यांत चिंचेला फुलोरा येतो व त्यानंतर चिंचा लागून मार्चपर्यंत त्यांची पूर्ण वाढ होते. त्यामुळे वेळेवर पावसाचे पाणी मिळाल्यानेच यंदा बºयाच झाडांना गतवर्षीपेक्षा चिंचेची लागण अधिक झाली आहे. मोठ्या प्रमाणावर चिंचा झाडांना लगडल्या असून, त्याचा बहर दिसून येत आहे. त्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यांत या चिंचा काढणीच्यावेळी उत्पादनात वाढ होण्याचे संकेत आहेत. गेल्यावर्षी चिंचेस विक्रमी दर मिळाला होता. यंदा चिंच उत्पादकांना ५० ते ७० रुपये किलोपर्यंत दर्जानुसार दर मिळाल्यास ऐन उन्हाळ्यात चिंचेच्या दराचा उन्हाळी बोनस मिळणार आहे.

इतिहासातील चिंच लागवड
म्हैसूर संस्थानात चिंच लागवडीत प्राधान्य दिल्याची इतिहासात नोंद आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या इंदोर संस्थानात ३०० वर्षांपूर्वी सुमारे ९०० ते १००० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दुतर्फा चिंचेची झाडे लावण्यात आली आहेत. त्याच्या उत्पादनाची लिलाव पद्धतीने विक्री केल्याची नोंद आहे.
 

बहुगुणी चिंच...
चिंच चवीला आंबट असली तरी ‘भारतीय खजूर’ म्हणून संबोधण्यात येणारी चिंच सार, चटणी, कोळ, अर्क, गर पावडर, पन्हे, सरबत, औषधे याकरिता उपयोगी आहे. जेवणामध्ये चिंचेचा सर्रास वापर केला जातो. तसेच चिंचेचे लाकूड मऊ व टिकाऊ असल्यामुळे फर्निचर, शेती कामाची औजारे बनविण्यासाठी या लाकडाला मोठी मागणी आहे. सध्या या लाकडाला २६५ रुपये घनफूट भाव मिळत आहे.

चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्व
चिंचेच्या १०० ग्रॅम गरामध्ये पाणी २१ टक्के, शर्करा ६७ टक्के, प्रथिने ३ टक्के, तंतुमय ५.६ टक्के, ‘क’ जीवनसत्त्व - ३ गॅ्रम, कॅल्शियम ०.१७ टक्के इतके प्रमाण असते. तसेच आम्लपित्त, पोटाचे विकार, निद्रानाश यासारख्या विविध विकारांवरही चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्व आहे, तर चिंचोक्यांचा स्टार्च, खळ, पावडर, बुक्का, कुंकू यांच्या निर्मितीत वापर होतो. मुंबई, सोलापूर, मालेगाव, बार्शी येथे चिंचोक्यांपासून खळ निर्मितीचे कारखाने आहेत.

 

 

Web Title: Summer bonuses for tasteless growers in Jat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.