शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

जिल्ह्यात सर्वत्र प्रचाराचा ‘सुपर संडे’!

By admin | Published: October 12, 2014 11:11 PM

विधानसभा निवडणूक : प्रचार सभा, पदयात्रा, गाठीभेटी, बैठकांनी वातावरण तापले

सांगली : प्रचार सभा, बैठका, भेटीगाठी, पदयात्रा, लाऊडस्पिकरवरील प्रचाराचा मारा... अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्हाभर आज प्रचाराचा ‘सुपर संडे’ उमेदवारांनी आणि नागरिकांनी अनुभवला. दिवसभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात प्रचाराचा धडाका सुरू होता. रिंगणातील शेकडो उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून आज प्रचार केला. सांगली जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघात सध्या काट्याची लढत होत आहे. चौरंगी आणि पंचरंगी लढतींमुळे प्रचाराचा धडाकाही यंदा वाढला आहे. रविवारी शासकीय सुट्टीमुळे मतदारांपर्यंत पोहोचण्याची शेवटची नामी संधी उमेदवारांना मिळाल्याने, आज उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते दिवसभर अविश्रांत राबत होते. दिग्गज नेते, माजी मंत्री आणि नवोदित उमेदवारांनीही प्रचारात ताकद लावली आहे. जिल्ह्यातील लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.सांगली विधानसभा मतदारसंघात आज काँग्रेसचे उमेदवार मदन पाटील यांनी गुरुद्वाराला भेट दिली. त्यानंतर डॉक्टर, रिक्षाचालक यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेतल्या. जुनी धामणी, अंकली, हरिपूर आणि संजयनगर येथेही त्यांचे प्रचार कार्यक्रम पार पडले. भाजपचे सुधीर गाडगीळ यांनीही सांगली शहरात रॅली व प्रचार सभा घेतल्या. सांगलीवाडी, नांद्रे, बुधगाव याठिकाणीही त्यांच्या प्रचार सभा झाल्या. इस्लामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार जयंत पाटील यांनी आज सावळवाडी, माळवाडी, मौजे डिग्रज येथे बैठका घेतल्या. शिराळा, मिरज, आष्टा आणि इस्लामपूर येथे त्यांच्या प्रचार सभा पार पडल्या. विरोधी अपक्ष उमेदवार अभिजित पाटील यांनी इस्लामपूर शहरात प्रचार केला. बावची येथे सभाही घेतली. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आर. आर. पाटील यांनी कुची, शिरढोण, अलकूड, देशिंग, खरशिंग, सावळज आणि मणेराजुरी येथे प्रचार सभा व बैठका घेतल्या. प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अजितराव घोरपडे यांनी तुरची, येळावी, मणेराजुरी, चिंचणी, कुमठा, सावळज येथे प्रचार सभा घेतल्या. वायफळे, यमगरवाडी येथे त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. मिरज मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ जाधव यांनी मिरज शहरातील चार प्रभागात पदयात्रा काढल्या. अपक्ष उमेदवार सी. आर. सांगलीकर यांनी बेडग, सोनी येथे पदयात्रा काढल्या, तर कवलापूर येथे जाहीर सभा घेतली. शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांनी तालुक्यातील शेणी, तांबवे, येलूर, चिकुर्डे येथे प्रचार सभा घेतल्या. शिराळा येथे खासदार सुप्रिय्ाा सुळे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. शिवाजीराव नाईक यांनी डोंगरवाडी, करंजवडे, मालेवाडी, विठ्ठलवाडी, पेठ, तांबवे, कासेगाव येथे सभा घेतल्या. खानापूर-आटपाडी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आ. सदाशिवराव पाटील यांनी आळते, चिखलगोठण, निंबळक, लिंब येथे प्रचार सभा घेतल्या.खानापूर आटपाडीत राष्ट्रवादीचे अमरसिंह देशमुख यांनी माहुली, चिखलगोठण, खानापूर, मांजर्डे, पारे, बलवडी येथे प्रचारसभा घेतल्या. जत विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांनी औंढी, लोहगाव, अंत्राळ, वायफळे येथे, तर राष्ट्रवादीचे प्रकाश शेंडगे यांनी सनमडी, खैराव, माडग्याळ, उमदी, सोन्याळ आणि जत येथे प्रचारसभा व पदयात्रा केल्या. पलूस-कडेगाव येथे पतंगराव कदम यांनी आज रायगाव, बोंबाळेवाडी, कडेगाव, पलूस येथे प्रचार सभा घेतल्या. विश्वजित कदम यांनी कडेगाव येथे रॅली काढली. प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी नेवरी, खेराडेवांगी येथे सभा तर कडेगाव व चिंचणी येथे बैठका घेतल्या. (प्रतिनिधी)स्टार प्रचारकांचीही हजेरीप्रचार संपण्यास एकच दिवस राहिल्याने रविवारी प्रत्येक पक्षाच्या स्टार प्रचारकांनी जिल्ह्यात प्रचार कार्यक्रमांना हजेरी लावली. शिराळा येथे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक खासदार सुप्रिया सुळे यांनी सभा घेतली. काँग्रेसचे स्टार प्रचारक पृथ्वीराज चव्हाण यांनी येलूर (ता. शिराळा) येथे सभा घेतली. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी भाजपचे सांगली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचार कार्यक्रमांना हजेरी लावली. रॅलीसह त्यांनी सभेतही प्रचार केला. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही कार्यकर्त्यांची बैठक घेतली.