शेतकरी आंदोलनास जत कामगार सेनेचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:24 AM2021-02-14T04:24:56+5:302021-02-14T04:24:56+5:30
जत : दिल्लीतील शेतकरी आंदोलनास जत तालुका महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. याबाबत जत तहसीलदार सचिन ...
जत : दिल्लीतील शेतकरी आंदोलनास जत तालुका महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. याबाबत जत तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने जे कृषी कायदे तयार केले आहेत ते शेतकऱ्यांना मान्य नाहीत. यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलेे आहे. ८० दिवस आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. यासाठी जत तालुका महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे. तसेच केंद्र सरकारचा निषेध निवेदनाद्वारे केला आहे.
यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे, जत तालुकाप्रमुख सुरेश घोडके, शाखाप्रमुख अर्जुन भोसले, उमराणी विभागप्रमुख शिवानंद तिकोंडी व सदाशिव बागल उपस्थित होते.