सुरेश खाडे यांच्याकडून पूरग्रस्तांच्या भोजन, निवारा व्यवस्थेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:28 AM2021-07-28T04:28:35+5:302021-07-28T04:28:35+5:30

मिरज : मिरजेत पूरग्रस्तांच्या भोजनाची, निवाऱ्याची व जनावरांच्या चाऱ्याच्या व्यवस्थेची आमदार सुरेश खाडे यांनी पाहणी केली. मिरज मार्केट ...

Suresh Khade inspects flood victims' food and shelter arrangements | सुरेश खाडे यांच्याकडून पूरग्रस्तांच्या भोजन, निवारा व्यवस्थेची पाहणी

सुरेश खाडे यांच्याकडून पूरग्रस्तांच्या भोजन, निवारा व्यवस्थेची पाहणी

Next

मिरज : मिरजेत पूरग्रस्तांच्या भोजनाची, निवाऱ्याची व जनावरांच्या चाऱ्याच्या व्यवस्थेची आमदार सुरेश खाडे यांनी पाहणी केली.

मिरज मार्केट कमिटीमधील जनावरांच्या बाजारात खाडे यांनी पूरग्रस्त भागातील जनावरांच्या छावणीची पाहणी केली. मिरज हायस्कूल येथील निवारा केंद्रात पूरग्रस्तांची विचारपूस व भोजन व्यवस्थेची पाहणी केली. ढवळी व म्हैसाळ येथे पूरपरिस्थितीची पाहणी करून, पाणीपुरवठा टँकरची व्यवस्था, कर्मवीर हायस्कूलमध्ये डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पूरग्रस्त नागरिकांना औषध उपचाराबाबत सूचना केल्या.

कृष्णाघाट परिसरात पाहणी करून, खाडे यांनी काच कारखान्यातील निवारा केंद्रास भेट दिली. कोल्हापूर रस्त्यावर खतीब हॉल परिसरात पूरग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, मोहन वाटवे, अरुण राजमाने, काकासाहेब धामणे, पंचायत समिती सभापती गीतांजली कणसे, बंडू पाटील, सुमन भंडारे, मनोज मुंडगणूर, नगरसेवक गणेश माळी, प्रकाश ढंग, परशुराम नागरगोजे, दादा शिंदे, दिगंबर जाधव, म्हैसाळच्या सरपंच रश्मीदेवी शिंदे, उमेश पाटील, राजू कोरे, वैभव नलवडे, डॉ.अनिल कोरबु, बाबासाहेब आळतेकर उपस्थित होते.

Web Title: Suresh Khade inspects flood victims' food and shelter arrangements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.