कुपवाडमध्ये लॉकडाऊनच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचे ‘थाळीनाद’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:27 AM2021-04-09T04:27:56+5:302021-04-09T04:27:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : शासनाच्या मिनी लॉकडाऊनच्या निषेधार्थ कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्यावतीने कुपवाड सोसायटी चौकामध्ये गुरुवारी सकाळी ‘थाळीनाद’ ...

'Thalinad' agitation of traders in Kupwad to protest the lockdown | कुपवाडमध्ये लॉकडाऊनच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचे ‘थाळीनाद’ आंदोलन

कुपवाडमध्ये लॉकडाऊनच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचे ‘थाळीनाद’ आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : शासनाच्या मिनी लॉकडाऊनच्या निषेधार्थ कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्यावतीने कुपवाड सोसायटी चौकामध्ये गुरुवारी सकाळी ‘थाळीनाद’ आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यापारी संघटनेच्यावतीने लॉकडाऊनचा निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली.

'कोरोना' संसर्ग नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अंमलबजावणीमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवावेत, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत कुपवाडमधील व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवरच कुपवाड शहर व्यापारी संघटनेने बुधवारी बोंबाबोंब आंदोलन केले.

तसेच दुसऱ्यादिवशीही अंदोलन सुरू ठेवत थाळीनाद आंदोलन केले. यावेळी व्यापाऱ्यांनी रस्त्यावर ताट, वाट्या, चमचे वाजवत आपली व्यथा व्यक्त केली. 'कोरोना' महामारीमुळे झालेल्या नुकसानीचा पाढा वाचत विविध फलक दर्शवून मदतीची मागणी केली.

या आंदोलनामध्ये संघटनेचे अध्यक्ष अमर दीडवळ, राजेंद्र पवार, लक्ष्मण पाटील, दादासाहेब रुपनर, विठ्ठल संकपाळ, सुरेश साखळकर, नंदकुमार वायचळ, अभिजित कोल्हापुरे, विजय खोत, श्याम भाट, सचिन नरदेकर, विशाल शिंदे, संतोष सरगर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

Web Title: 'Thalinad' agitation of traders in Kupwad to protest the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.