सांगली : देशभर पुकारण्यात आलेल्या ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतचे आदेश दिले असून, हजारांवर पोलीस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तात असणार आहेत.
मंगळवारी बंदच्या कालावधित कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य राखीव दलाची एक तुकडीही कार्यान्वित असणार आहे. जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. दिवसभरात ५१ वाहनांव्दारे विविध भागात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंगळवारचा बंद शांततेत पार पाडण्यासाठी पथकाचे नियोजन असणार आहे.
चौकट
बंदोबस्तासाठी पोलीस तैनात
बंदच्या पाेलीस बंदोबस्तात अप्पर अधीक्षकांसह ७ उपअधीक्षक, ११ निरीक्षक, ५४ सहायक व उपनिरीक्षक, ६९४ पाेलीस कर्मचारी व ५०८ होमगार्ड यांचा समावेश आहे.