मंगळवारी रात्री स्वाती किराणा स्टोअर्समध्ये जबरी चोरी झाली. त्यामध्ये रोख ४५ हजार रुपये व ५ तोळे सोने, तेलाचे ४ डबे चाेरट्यांनी लंपास केले. दुसरी घटना कुरुंदवाडी येथे घडली. येथील येसाबाई खताळ यांचे चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. तसेच विजय वगरे यांच्या घराचा गज चाेरट्यांनी काढला. तसेच जोतिराम वगरे यांच्या दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल पावणे यांच्या घरांमध्ये आवाज होताच विठ्ठल पावणे यांचे वडील दादा पावणे हे जागे झाले. घरात तीन अनाेळखी व्यक्ती पाहून त्यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून विठ्ठल पावणे, त्यांची मुले सुमित व सुजित यांनी बाहेर धाव घेतली. त्यांना पाहून चाेरट्यांनी आपल्याजवळील कुकरीने तिघांवरही हल्ला चढविला. यावेळी आरडाओरडा, गोंधळ झाल्याने चोरट्यांनी पळ काढला.
चोरी होत असताना घराबाहेर दुचाकी उभी होती, तर तिथून पाचशे फुटांवर बसस्थानकाशेजारी माेटार उभी होती. असे नागरिकांनी सांगितले.
जखमींना आटपाडी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे कोरोनाचे रुग्ण असल्याने प्राथमिक उपचार करुन जखमींना म्हसवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपास सहायक निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे यांनी भेट देऊन पाहणी केली.
चौकट
चोऱ्या वाढल्या : नागरिकांमध्ये घबराट
झरे परिसरामध्ये एका महिन्यामध्ये सहा ठिकाणी चोरी होते. यापूर्वी झरेत तीन ठिकाणी चोरी झाली. त्यानंतर विभुतवाडी, कुरुंदवाडी येथे चोरी झाली. एकाच महिन्यामध्ये दोनवेळा चोरी झाली. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी हाेत आहे. घटनास्थळी श्वानपथक आले होते. ते १०० ते १५० फुटापर्यंत जाऊन घुटमळले.
फाेटाे : १६ आटपाडी १..२