कुपवाड एमआयडीसीत रिक्षा उलटून तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:31 AM2021-09-12T04:31:41+5:302021-09-12T04:31:41+5:30

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील दत्तनगरजवळ भरधाव रिक्षा उलटल्याने रिक्षातील तीन प्रवासी जखमी झाले. संंगीता बापू रणशिंगे (वय ४०), निकिता ...

Three injured in rickshaw overturn at Kupwad MID | कुपवाड एमआयडीसीत रिक्षा उलटून तीन जखमी

कुपवाड एमआयडीसीत रिक्षा उलटून तीन जखमी

Next

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील दत्तनगरजवळ भरधाव रिक्षा उलटल्याने रिक्षातील तीन प्रवासी जखमी झाले. संंगीता बापू रणशिंगे (वय ४०), निकिता अर्जुन रजपूत (२०, दोघेही रा. दत्तनगर, बामणोली), विद्या सुनील साठे (१६, रा. कुपवाड) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली असून, पोलिसांनी रिक्षा चालक विनोद विष्णू मलमे (४३, रा. बामणोली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद मलमे कुपवाडमधून रिक्षात (एमएच १० सीक्यू ४२०) प्रवासी घेऊन कुपवाड एमआयडीसीमार्गे दत्तनगर (बामणोली) येथे जात होते. एमआयडीसीतून भरधाव वेगाने जाताना मलमे यांचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षातील तीनही प्रवासी जखमी झाले. जखमीवर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. पोलिसांनी रिक्षा जप्त करून चालक मलमे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Three injured in rickshaw overturn at Kupwad MID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.