सांगली : वधू-वर सूचक मंडळाच्या नावाखाली मुलांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. बुधवारी विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणखी तीन तक्रारी दाखल झाल्या. दरम्यान, वधू-वर सूचक मंडळाचे चालक, मालक केंद्राला टाळे लावून गायब झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.आपटा पोलिस चौकीजवळील राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राविरोधात रमेश तम्मा कोळेकर (वय २६, रा. सलगरे) याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात २५ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी केंद्राचे प्रमुख राजकिशोर शिंदे, पत्नी विजया शिंदे व व्यवस्थापक श्रीमती देशमुख (पूर्ण नाव नाही) अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी शशिकांत नारायण हुल्याळ (सीतारामनगर), लक्ष्मण महादेव खारे (रा. म्हैसगाव, ता. माढा), अनिल हणमंत जगदाळे (रा. तासगाव) या तिघांनी विश्रामबाग पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली. यात हुल्याळ यांनी तीन हजार, खारे यांची १५ हजार, तर जगदाळे याची ५७ हजार रुपयांना फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राची जाहिरात पाहून त्यांनी केंद्राशी संपर्क साधला होता. केंद्रात आल्यानंतर शुल्कापोटी काही रक्कम भरून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना मुलींच्या छायाचित्राचा अल्बम दाखविण्यात आला. त्यापैकी पसंत असलेल्या मुलीशी विवाह करण्यासाठी आणखी रकमेची मागणी करण्यात आली.ही रक्कम दिल्यानंतर केंद्रातच लग्न लावले जाणार असल्याचे सांगण्यात आले. पण बुधवारी वृत्तपत्रात या केंद्राकडून फसवणूक झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच इतर तिघांनीही फसवणुकीची तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, वधू-वर सूचक केंद्राला टाळे लावून मालक, चालक गायब झाले आहेत.या केंद्राची एक शाखा पुण्यात असावी, असा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
सांगलीत सूचक मंडळाचे चालक, मालक केंद्राला टाळे लावून गायब : आणखी तीन तक्रारी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:25 PM
सांगली : वधू-वर सूचक मंडळाच्या नावाखाली मुलांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.
ठळक मुद्देपोलिसांकडूृन संशयितांचा शोध सुरू वधू-वर सूचक मंडळाकडून फसवणुकीची व्याप्ती वाढली