म्हैसाळच्या त्या विद्यालयातील तीन विध्यार्थी, महिला शिपाई पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:05 PM2021-03-20T16:05:11+5:302021-03-20T16:07:10+5:30
corona virus Miraj sangli- म्हैसाळच्या त्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील तीन विध्यार्थी व एक महिला शिपाई कोरोना पॉझिटिव्ह आल्याने विध्यार्थी व पालकांच्यात भिती निर्माण झाली आहे. याशिवाय त्यांच्या घरातील नातेवाईकांची अन्टिजन चाचणी केली आहे. त्या मध्ये आणखी दोनजण पॉझिटिव्ह आले असून त्यांना होम काँरटाईन केले आहे.
म्हैसाळ : म्हैसाळच्या त्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील तीन विध्यार्थी व एक महिला शिपाई कोरोना पॉझिटिव्ह आल्याने विध्यार्थी व पालकांच्यात भिती निर्माण झाली आहे. याशिवाय त्यांच्या घरातील नातेवाईकांची अन्टिजन चाचणी केली आहे. त्या मध्ये आणखी दोनजण पॉझिटिव्ह आले असून त्यांना होम काँरटाईन केले आहे.
१८ मार्च रोजी येथील एका विद्यालयातील एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले होते.त्यानंतर गावातील शालेय सल्लागार समितीची शालेय प्रशासनाने बैठक घेऊन शाळा १४ दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या शिक्षकांच्या संपर्कात आलेल्या या विद्यालयातील पहिल्या टप्प्यात ९८ तर दुसऱ्या टप्प्यात ६१ जणांचे स्वब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
त्यापैकी पहिल्या टप्प्यात तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ९८ जणाच्या पैकी तीन विध्यार्थी तर एक महिला शिपाई पॉझिटिव्ह आल्याने विध्यार्थी व पालकांच्यात भितीचे वातावरण असून संपर्कात आलेल्या नागरीकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केद्रांच्या वतीने करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात तपासणी झालेल्या मध्ये तीन विध्यार्थी व एक महिला शिपाई कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांच्या घरातील नातेवाईकांची अन्टिजन चाचणी केली आहे. त्या मध्ये आणखी दोनजण पॉझिटिव्ह आले असून त्यांना होम काँरटाईन केले आहे.
-डॉ नंदकुमार खंदारे,
वैद्यकीय अधिकारी
म्हैसाळ.