सांगली : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत कार्यरत असलेल्या नऊ पोलीस अधिकर्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शुक्रवारी जारी केले. .
बदलीमध्ये नियंत्रण कक्षातील सहायक निरीक्षक समीर ढेरे यांची सांगली शहर पोलीस ठाणे, नियंत्रण कक्षातील महिला सहायक निरीक्षक शकुंतला वागलगावे यांची महिला सहायता कक्ष, आवेदन शाखेतील सहायक निरीक्षक उदय देसाई यांची आष्टा पोलीस ठाणे, नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक तुषार काळेल यांची कुपवाड औद्योगिक पोलीस ठाणे, उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे यांची कासेगाव पोलीस ठाणे, उपनिरीक्षक संजय पाटील यांची कोकरूड पोलीस ठाणे, महिला उपनिरीक्षक वर्षा जगदाळे यांची आर्थिक गुन्हे शाखा, उपनिरीक्षक विकास देवकर यांची अतिजलद पथक व दंगल नियंत्रण पथक, उपनिरीक्षक दत्तात्रय भोरे यांची इस्लामपूर न्यायालय येथे बदली करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.