विष्णूअण्णा पाटील यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:24 AM2021-02-13T04:24:58+5:302021-02-13T04:24:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सहकारमहर्षी विष्णूअण्णा पाटील यांच्या २१व्या पुण्यतिथीनिमित्त स्मारकस्थळी जयश्रीताई मदन पाटील, माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री ...

Tribute to Vishnuanna Patil | विष्णूअण्णा पाटील यांना आदरांजली

विष्णूअण्णा पाटील यांना आदरांजली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सहकारमहर्षी विष्णूअण्णा पाटील यांच्या २१व्या पुण्यतिथीनिमित्त स्मारकस्थळी जयश्रीताई मदन पाटील, माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, शैलजाभाभी पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी विश्वासबापू पाटील, अरविंद पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, एन.एस. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. सिकंदर जमादार, माजी महापौर सुरेश पाटील, किशोर शहा, विष्णुअण्णा पाटील खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यवाह आनंदराव पाटील, उपाध्यक्ष जी. के. पवार, भावेश शहा, सलगरचे सरपंच तानाजी पाटील, पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे, नगरसेवक संजय मेंढे, प्रकाश मुळके, फिरोज पठाण, संतोष पाटील, मनोज सरगर, अमर निंबाळकर, संजय कांबळे, नगरसेवक मदिना बारुदवाले, माजी नगरसेवक अजित सूर्यवंशी, महाबळेश्वर चौगुले, वाय. डी. पाटील, आनंद शिंदे, जितेंद्र कोळसे, सुभाष घार्गे, वसंतदादा दंतमहाविद्यालयाचे सुभाष आवटी, प्यारेलाल सनदी, सतीश हेरवाडे, आप्पा सूर्यवंशी, अनिल भोसले, शिवाजीनगर शिक्षण संस्था, सर्वोदय शिक्षण संस्था, युवक काँग्रेसचे सदस्य उपस्थित होते.

चौकट

युवा मंचच्या वतीने पुष्पहार अर्पण

मदनभाऊ युवा मंचच्या वतीने माजी महापौर किशोर शहा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते महापालिकेच्या पुस्तक बँकेला पुस्तके प्रदान करण्यात आली. यावेळी युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक प्रकाश मुळके, शीतल लोंढे, हाजीतौफीक बिडीवाले, मयूर बांगर, प्रवीण निकम, संजय कांबळे, अमर निंबाळकर, अमित लाळगे, वाहिद बेग, आय्याज मुजावर, शरद गाडे, संतोष कुरणे, प्रकाश गावडे, लालसाब तांबोळी उपस्थित होते.

फोटो ओळी :- सहकारमहर्षी विष्णूअण्णा पाटील यांच्या २१व्या पुण्यतिथीनिमित्त स्मारकस्थळी जयश्रीताई पाटील, माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, शैलजाभाभी पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

Web Title: Tribute to Vishnuanna Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.