तिकोंडीत पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी बारा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:25+5:302021-06-24T04:19:25+5:30
संख : तिकोंडी (ता. जत) येथे शनिवारी दोन गटाचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या उमदी पोलिसांवर जमावाने हल्ला केला होता. यामध्ये ...
संख : तिकोंडी (ता. जत) येथे शनिवारी दोन गटाचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या उमदी पोलिसांवर जमावाने हल्ला केला होता. यामध्ये पोलीस, होमगार्ड जखमी झाल्यानंतर १६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील बारा जणांना अटक केली असून, तीन जण फरारी आहेत. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
तिकोंडी येथे शनिवारी सायंकाळी करेवाडी (तिकोंडी) व तिकोंडी येथील दोन गटात वादावादी झाली. दोन्ही बाजूंनी जमाव जमला होता. वादावादी सुरू असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस, होमगार्ड घटनास्थळी गेले. पोलीस जमावाला समजावून सांगत होते. मात्र जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जमावाला पांगविताना लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये पोलीस नाईक नागेश खरात यांच्या डोक्यात लोखंडी गजाने व होमगार्ड सचिन कोळेकर यांना काठीने मारहाण केली होती. बुधवारी १२ संशयिताना अटक करण्यात आली. त्यामध्ये तम्मराया चनाप्पा बेळुंखी (वय २६), अंबाना भीमराया कोळी (२३), सुनील आडव्याप्पा अमृतहट्टी (३४), विठ्ठल बसप्पा आवटी (३५), उमेश भीमण्णा अमृतहट्टी (३४), तम्माराया गंगाप्पा ऊर्फ गंगाप्पा अमृतहट्टी (३४), अनिल हणमंत हट्टी (२४), मदगौंडा ऊर्फ मधु विठ्ठल हिचगिरी (३८), बसवराज ऊर्फ बसू रामण्णा येलगार (२९), अशोक रामण्णा येलगार (२४), परसू गेनबा महाजन (५५, सर्वजण तिकोंडी) यांचा समावेश आहे. शनिवारीच माजी उपसरपंच मुत्ताप्पा मल्लाप्पा वडीयार (३५) याला अटक केली होती.
अजून तीन संशयित फरारी आहेत. बनाप्पा पुजारी (माराया ), दिलीप आवटी, शिरमु अमृतहट्टी, विकास राचगोंंड अशी त्यांची नावे आहेत.