कामेरीत दोन दिवसात पुन्हा १४ जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:25 AM2021-05-15T04:25:24+5:302021-05-15T04:25:24+5:30
कामेरी : कामेरीत गुरुवारी व शुक्रवारी प्रत्येकी सात जण कोरोनाबाधित झाल्याने दोन दिवसात १४ जण बाधित झाले. बधितांचा ...
कामेरी : कामेरीत गुरुवारी व शुक्रवारी प्रत्येकी सात जण कोरोनाबाधित झाल्याने दोन दिवसात १४ जण बाधित झाले. बधितांचा एकूण आकडा २३२वर पोहोचला आहे. कामेरीत वाढत्या कोरोनाबधितांच्या संख्येमुळे पहिल्या लाटेप्रमाणे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. २३२ बाधित झाले आहेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३७ जण उपचार घेत आहेत, तर ९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. बहुतेक बाधित रुग्ण एकाच घरातील अथवा शेजारच्या घरातील असल्याने ज्यांच्याकडे स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नाही, त्यांनी कामेरी ग्रामपंचायतने प्राथमिक शाळेत बाधित रुग्णांना होम आयसोलेशनने उपचार घेणाऱ्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्या ठिकाणी थांबले तरच रुग्णसंख्या आटोक्यात येण्यासाठी मदत होणार आहे. नागरिकांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा व कोरोनासाठीचे नियम पाळावेत, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी केले आहे.