संखजवळ माेटारीस धडकून दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:31 AM2021-09-12T04:31:39+5:302021-09-12T04:31:39+5:30

संख : जत तालुक्यातील संख-दरीबडची रस्त्यावर माळी वस्ती येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ माेटारीला मागील बाजूने धडक दिल्याने दुचाकीस्वार ...

The two-wheeler was killed on the spot after hitting a motorbike near Sankh | संखजवळ माेटारीस धडकून दुचाकीस्वार जागीच ठार

संखजवळ माेटारीस धडकून दुचाकीस्वार जागीच ठार

Next

संख : जत तालुक्यातील संख-दरीबडची रस्त्यावर माळी वस्ती येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ माेटारीला मागील बाजूने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. गोविंद टोळू पवार (वय ४७, रा. उटगी-लमाणतांडा, ता. जत) असे मृताचे नाव आहे. अपघातात शंकर लमाण (५०, रा. उटगी-लमाणतांडा) हे जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजता घडली. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात नाेंद झाली आहे.

पूर्व भागातील जाडरबोबलाद व कर्नाटकातील डाळिंबाची बाग पाहून संख-दरीबडची रस्त्यावरवरून काही डाळिंब व्यापारी मोटारीतून (क्र केए २८ झेड ५०१२) गावी निघाले होते, तर लमाणतांडा (दरीबडची) येथे कामानिमित्त आलेले गोविंद पवार व शंकर लमाण हे दोघे दुचाकीवरून (क्र. एमएच १० डीएफ ७१९३) उटगी-लमाणतांडा या मूळ गावी निघाले होते. माळी वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ त्यांची दुचाकी ताबा सुटल्याने पुढे जाणाऱ्या माेटारीला जाऊन धडकली. अपघातात दाेघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ आपत्कालीन रुग्णवाहिका बाेलावली. यावेळी डॉक्टरनी गाेविंद पवार यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करून जखमी शंकर लमाण यांना उपचारासाठी दाखल केले.

धडक इतकी जोराची होती की, दुचाकीस्वार दाेघेही गाडीवरून उडून पडले. गाेविंद पवार यांच्या डोक्याला जोराचा मार लागला. नाक, कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर शंकर लमाण हे गंभीर जखमी झाले. त्याच्यावर संख प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अपघातात माेटारीचे माेठे नुकसान झाले आहे. याबाबत सुरेश आण्णाप्पा पवार यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास आर. एस. बन्नेनवर करीत आहेत.

Web Title: The two-wheeler was killed on the spot after hitting a motorbike near Sankh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.