Sangli: शिराळा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, ऊसतोड ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 07:31 PM2024-12-06T19:31:46+5:302024-12-06T19:32:15+5:30

शिराळा : शिराळा तसेच तालुक्यातील काही भागात आज, शुक्रवारी सायंकाळीच्या सुमारास पाऊण तास पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना ...

Unseasonal rains in Shirala taluka Sangli, sugarcane cutting stopped  | Sangli: शिराळा तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, ऊसतोड ठप्प 

संग्रहित छाया

शिराळा : शिराळा तसेच तालुक्यातील काही भागात आज, शुक्रवारी सायंकाळीच्या सुमारास पाऊण तास पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही ठिकाणी ऊसतोड ठप्प झाली.

जिल्ह्यात गेली पाच सहा दिवसापासून ढगाळ व पावसाचे वातावरणात होत होते. आज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान  शिराळा शहर, उत्तर भागात तसेच पश्चिम भागात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. शाळू, हरभरा रब्बी पिकांसाठी हा पाऊस चांगला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

तालुक्यात या वर्षी पावसाळी, परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पाणीसाठा समाधानकारक आहे. रब्बी हंगामातील ६० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. पहिल्या टप्यातील पिके जैमात आहेत. आजचा अवकाळी पाऊस रब्बी  हंगामातील उगवन झालेल्या व उर्वरीत पेरणीपूर्व मशागतीला व ऊस पिकासाठी उपयुक्त आहे. सध्या  रब्बीच्या आंतरमशगतीची कामे व उर्वरीत पेरणीला गती आली आहे.

Web Title: Unseasonal rains in Shirala taluka Sangli, sugarcane cutting stopped 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.