कोविड संसर्गाचा धोका असल्याने कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह वाहून नेण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र शववाहिकेची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र मिरजेत कोविडने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह वाहून नेणाऱ्या महापालिकेच्या शववाहिका साधारण मृतांसाठीही वापरण्यात येत आहेत. कोविडचे मृतदेह वाहतुकीसाठी वेगळ्या व्यवस्थेऐवजी महापालिकेच्या साधारण शववाहिकेतूनच कोविडचे मृतदेह नेण्यात येत आहे. कोविडचे मृतदेह नेल्यानंतर त्या शववाहिकेचे निर्जंतुकीकरण केले जात नाही. चालकास पीपीई कीट देण्यात येत नाही. स्वतंत्र शववाहिका नसल्याने कोविड संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेने कोविड मृतांसाठी स्वतंत्र शववाहिकेची व्यवस्था करावी, अन्यथा रिपाइंतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष अविनाश कांबळे, योगेंद्र कांबळे, उपाध्यक्ष शानूर पानवाले, संतोष कांबळे यांनी उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कोविड मृतदेह वाहून नेणाऱ्या शववाहिकेचा इतरांसाठीही वापर;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:26 AM