दिलीप मोहिते
विटा : रोगांचा प्रादुर्भाव व डाळिंबावर उन्हामुळे पडणारे चट्टे थांबवून फळांची गुणवत्ता टिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी शेडनेट किंवा नॉन ओव्हन पेपरचा वापर सुरू केलाआहे.त्या साहाय्याने झाडे व फळांना आवरण घातले आहे.
लालभडक डाळिंबासाठी प्रसिध्द असलेल्या खानापूर, आटपाडी, तासगाव, सांगोला व खटाव, माण तालुक्यांतील डाळिंब उत्पादक यावर्षी अवकाळी पावसाने खचून गेला आहे. डाळिंबाची निर्यात करणाऱ्यांना परतीच्या पावसाने अपेक्षित उत्पन्न मिळू शकत नाही, तर निर्यातक्षम डाळिंब बागांना करपा, तेल्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. पावसाने पाणी साचून राहिल्याने मुळांची कूज होऊन झाडे पूर्णपणे कोलमडून गेली.काही ठिकाणी उशिरा छाटण्या घेतलेल्या डाळिंब बागांना स्थानिक बाजारपेठेत चालणारी चांगली फळधारणा झाली आहे. परंतु, सध्या ऊन, ढगाळ वातावरण आणि अनेक रोगांचा होणारा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी शेतकºयांनी आता शेडनेट किंवा नॉनओव्हन पेपरचे आवरण घातले आहे.
जिल्'ातील खानापूर, आटपाडी, तासगाव, सोलापूर जिल्'ातील सांगोला, सातारा जिल्'ातील खटाव व माण आदी तालुक्यात शेतक-यांनी डाळिंब बागांतील झाडे व फळे पूर्णपणे झाकून घेतली आहेत. त्यामुळे धुके, दव, उन्हामुळे फळांना पडणारे चट्टे आणि रोगांचा प्रादुर्भाव ब-याच प्रमाणात कमी होणार आहे. डाळिंब फळांना नॉनओव्हन पेपरचे आवरण घातल्यानंतर औषधांचे प्रमाण कमी लागून मोठे कीटक, ऊन, बुरशी आदी रोगांपासून फळांचे संरक्षण होत आहे.गुणवत्ता राखण्यासाठी प्रयोगअवकाळी पावसाने डाळिंब बागांना फटका बसला आहे. सध्या फळधारणा झालेली झाडे वाचविण्यासाठी शेतकºयांनी नॉन ओव्हन पेपर व शेडनेटचा आधार घेतला आहे. अतिपावसाने निर्यात डाळिंब उत्पादन थांबले आहे. त्यामुळे सध्याच्या फळांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी, फळांची गुणवत्ता राखण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत, अशी प्रतिक्रिया येथील डाळिंब उत्पादक व संशोधक दीपक कदम यांनी दिली.अवकाळी पावसाने नेस्तनाबूत झालेला शेतकरी आता हातात येऊ लागलेले डाळिंब वाचविण्यासाठी झाडांना व फळांना नॉनओव्हन पेपरव्दारे आवरण घालत असल्याचे चित्र खानापूर व आटपाडी तालुक्यात पाहावयास मिळत आहे.