बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गौंडवाडीमधील ४५ वर्षे वयावरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानेच हे शक्य झाले असल्याचे मत आरोग्य अधिकारी डॉ. चेतना साळुंखे यांनी व्यक्त केले. आरोग्य विभागाच्यावतीने सरपंच योगेश लोखंडे यांचे विशेष आभारही मानले.
सरपंच योगेश लोखंडे म्हणाले, ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या विनंतीला मान देऊन गावातील ४५ वयावरील नागरिकांनी लस घेतल्याने आता गाव कोरोनामुक्त होईल. १ मेपासून १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. याचाही नागरिकांनी लाभ घ्यावा.
लसीकरण मोहिमेसाठी डॉ. सुवर्णा साळुंखे, ग्रामसेवक पूनम निकम, आरोग्य सेविका, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.