सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या जागा विक्रीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश देण्यास नकार दिला; पण जागा विक्रीबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देताना न्यायालयाच्या संमतीनेच निविदा अंतिम करण्याचे आदेश दिले. वसंतदादा कारखान्याने शेतकऱ्यांची बिले, बँकेची देणी भागविण्यासाठी २१ एकर जागा विक्रीस काढली आहे. त्यासाठी सहकार विभागानेही मान्यता दिली होती. त्यानुसार जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्या अध्यक्षतेखाली चारजणांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. कारखान्याने प्लॉटपद्धतीने जागा विक्री करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. या निविदेची मुदत दोन ते तीन दिवसात संपत आहे. निविदा अंतिम करण्यास मनाई करीत न्यायालयाच्या संमतीनेच पुढील प्रक्रिया होईल, असे स्पष्ट केल्याचे कोतमिरे यांनी सांगितले. याचिकाकर्त्यांचे वकील आशुतोष कुंभकोणी यांनी निविदा अंतिम करण्यास मनाई केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)स्थगितीची याचिका फेटाळलीजिल्हा बँकेचे माजी संचालक शिवाजी पाटील व इतर काहीजणांनी जागा विक्रीस स्थगिती द्यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात आज याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांची स्थगितीची मागणी फेटाळत न्यायालयाने निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली.
वसंतदादाच्या जागेची विक्री न्यायालयाच्या संमतीने होणार
By admin | Published: October 13, 2014 10:29 PM