लोकमतच्या दणक्यानंतर म्हैसाळ मध्ये ५ मे ते१५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 11:41 AM2021-05-04T11:41:05+5:302021-05-04T11:45:05+5:30
CoronaVirus Sangli : म्हैसाळ व विजयनगर या गावामध्ये आतापर्यंत कोरोनाने दहा जणांचा मुत्यू झाला आहे.या पाश्र्वभूमीवर लोकमतने म्हैसाळ मध्ये कडक लाँकडाऊनची गरज अशी आँनलाईन बातमी प्रसिद्ध केली होती.या बातमीच्या दणक्याने अखेर आज म्हैसाळ आपत्ती व्यवस्थापन समितीने बैठक घेत म्हैसाळ मध्ये कडक लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.यामध्ये दवाखाने,मेडिकल व दूध व्यवसाय यांना मुभा देण्यात आली.
सुशांत घोरपडे
म्हैसाळ : म्हैसाळ व विजयनगर या गावामध्ये आतापर्यंत कोरोनाने दहा जणांचा मुत्यू झाला आहे.या पाश्र्वभूमीवर लोकमतने म्हैसाळ मध्ये कडक लाँकडाऊनची गरज अशी आँनलाईन बातमी प्रसिद्ध केली होती.या बातमीच्या दणक्याने अखेर आज म्हैसाळ आपत्ती व्यवस्थापन समितीने बैठक घेत म्हैसाळ मध्ये कडक लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.यामध्ये दवाखाने,मेडिकल व दूध व्यवसाय यांना मुभा देण्यात आली.
म्हैसाळ व विजयनगर मध्ये कोरोना रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आता एकूण रूग्ण 120 आहेत.त्यापैकी 109 जणांच्यावर होमआसोलेशन मध्ये उपचार सुरू आहेत. तर 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.तरीही म्हैसाळ आपत्ती व्यवस्थापन समिती कोणताही निर्णय घेत नव्हती. त्यामुळे ग्रामस्थातून या समितीच्या सदस्यावर नाराजी होती.
ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडायच्या तर कोणाकडे ? अशा प्रकारचे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत होते.त्यामुळे लोकमतच्या वाचकांनी याबाबत आवाज उठविण्याची विनंती केली होती.त्यानुसार आज आँनलाईन बातमी प्रसिद्ध करताच अखेर म्हैसाळ आपत्ती व्यवस्थापन समितीला जाग आली.यामुळे अनेकांनी लोकमतचे आभार मानले. गावात विनाकारण फिरताना आढळल्यास अँन्टिजन चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती म्हैसाळ आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव सुधाकर कुणके यांनी सांगितले.
- विनामास्क फिरल्यास -200 रू दंड
- दुकान उघडे ठेवल्यास -2000 रू दंड
- बिअर शाँपी व दारू दूकान उघडल्यास -5000 रूं दंड