शेतीच्या बांधापर्यंत ‘म्हैसाळ’चे पाणी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:22 AM2021-04-03T04:22:35+5:302021-04-03T04:22:35+5:30
जत : जत तालुक्यातील मतदारांनी पाण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवला व काम करण्याची संधी दिली, आज तो विश्वास सत्यात उतरताना ...
जत : जत तालुक्यातील मतदारांनी पाण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवला व काम करण्याची संधी दिली, आज तो विश्वास सत्यात उतरताना दिसत आहे. आगामी कालावधीत पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत म्हैसाळ योजनेचे पाणी देऊ, असे आश्वासन आमदार विक्रम सावंत यांनी दिले.
म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या मुख्य कॅनाॅलवरील अंत्राळ-सिंगनहळ्ळी वितरीका व त्यावरील लघुवितरीका बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे उद्घाटन आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
आवंढी, लोहगाव, सिंगनहळ्ळी या गावाकडे म्हैसाळ योजनेचा कॅनाॅल रद्द झाला होता. अधिकाऱ्यांच्या मदतीने व आम्ही सतत पाठपुरावा केल्यामुळे तो मंजूर झाला आहे. आमदार नसताना आमची लढाई पाण्यासाठी होती. आज या भागात पाणी आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान बदलणार आहे, असे सांगून आमदार विक्रम सावंत म्हणाले की, कायमस्वरूपी दुष्काळी असलेला जत तालुका शंभर टक्के सिंचनाखाली आणणे हे माझे ध्येय आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर सतत पाठपुरावा सुरू आहे. उन्हाळी आवर्तनात या भागात पाणी देण्याचा शब्द दिला होता, आज तो पूर्ण झाला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री विश्वजित कदम यांनी यासाठी मदत केली असल्याचे आमदार सावंत यांनी यावेळी सांगितले.
बाबासाहेब कोडग यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आप्पाराया बिराजदार, रवींद्र सावंत, दिग्विजय चव्हाण, भूपेंद्र कांबळे, अमोल चोपडे, अभिमन्यू मासाळ, सुहास पवार, एन. एन. दळवी, जे. के. पुरोहित, ए. एफ. मिरजकर, विठ्ठल औरसंगे, आण्णासाहेब गायकवाड, बालिका काशिद आदी उपस्थित होते.
चौकट
चाैकट
पाण्याची नासाडी थांबणार
बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची एकूण लांबी १२.९३ की.मी. असून १ हजार ५१ हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या चेंबरमुळे ४० ते ५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. पाण्याची नासाडी कमी प्रमाणात होऊन शेतकऱ्यांच्या बांधपर्यंत पाणी पोहचविण्याचे काम होणार आहे.