सावळज भागात पाणीपुरवठा योजनांची वीज तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:26 AM2021-03-19T04:26:12+5:302021-03-19T04:26:12+5:30
ही कारवाई वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार केली असल्याची माहिती सावळज विभागाचे उपकार्यकारी अभियंता एन. डी. वालावलकर यांनी दिली. दरम्यान, महावितरणने ...
ही कारवाई वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार केली असल्याची माहिती सावळज विभागाचे उपकार्यकारी अभियंता एन. डी. वालावलकर यांनी दिली. दरम्यान, महावितरणने वीजबिलाच्या थकबाकीपोटी कारवाईचा बडगा उगारताना वीज तोडल्याने ऐन उन्हाळ्यात पाच गावांमध्ये पाणीबाणी निर्माण होणार आहे. ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींना महावितरणने नोटीस बजावली होती. थकबाकी न भरल्यास योजनेचे कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला होता. यानंतर काही ग्रामपंचायतींनी बिल भरले; परंतु याकडे गांभीर्याने लक्ष न देता काही ग्रामपंचायतींनी वीज बिल भरण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे सावळज उपविभागाने गुरुवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला.
कारवाईत सावळज गावाला पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचीही वीज तोडण्यात आली होती. कारवाई होताच ग्रामपंचायतीने लगेच वीज बिल भरण्याची तरतूद करून ते भरल्याने खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.