..मग पवारांच्या घरी कशाला जाता? जयंत पाटील यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 05:45 AM2017-11-28T05:45:36+5:302017-11-28T05:45:59+5:30
शरद पवार यांनी शिवसेनेला शिकवू नये म्हणता, मग त्यांच्या घरी सल्ला घेण्यास जाता कशाला, असा सवाल राष्टÑवादीचे नेते जयंत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला.
इस्लामपूर (जि.सांगली) : शरद पवार यांनी शिवसेनेला शिकवू नये म्हणता, मग त्यांच्या घरी सल्ला घेण्यास जाता कशाला, असा सवाल राष्टÑवादीचे नेते जयंत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला.
इस्लामपूर येथील तहसीलदार कार्यालयावर राष्ट्रवादीच्यावतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेक इन महाराष्ट्र’च्या माध्यमातून राज्यात किती नवी गुंतवणूक आणली आणि राज्यातील किती युवकांना रोजगार दिला, हे एकदा जाहीर करावे़ गृहमंत्री असूनही सांगली जिल्ह्याच्या दौºयावर आल्यानंतर त्यांना अनिकेत कोथळेच्या कुटुंबास भेटण्यास वेळ मिळाला नाही. सध्या सरकारकडे वीज प्रकल्पांसाठी कोळसा घेण्यास पैसा नाही़ आमच्या सरकारने या राज्याला भारनियमनातून मुक्त केले़ आता हे सरकार पुन्हा भारनियमनाकडे राज्याला घेऊन चालले आहे़ राज्यातील तूरडाळीच्या आधारभूत दराचा प्रश्न गंभीर असताना, पंतप्रधान मोदी यांनी मोझॅँबिक देशातून एक लाख टन तूरडाळ आयात केली. हा शेतकºयांना खड्ड्यात घालण्याचा डाव आहे.
इतरांच्या ‘आयाती’साठी भाजपा नेते भीक मागताहेत!
दिसेल त्याला पक्षात घेणे हा भाजपचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे़ त्यांनी भीक मागितली नाही, असा राज्यात एकही तालुका राहिला नसेल़ २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निभाव लागणार नसल्याने दुसºया पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी हे धडपडत आहेत़ त्यांना जनतेच्या प्रश्नांचे देणे-घेणे नाही, असाही टोला पाटील यांनी लगावला.