विट्यात रुग्णालयाच्या इमारतीचे छत कोसळून महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:30 AM2021-09-22T04:30:29+5:302021-09-22T04:30:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : इमारतीच्या छतावरील पॅरापेटचा भाग रुग्णालयाच्या शेडवर कोसळून उपचारासाठी आलेली महिला ठार, तर तिची बहीण ...

A woman was killed when the roof of a hospital building collapsed in Vita | विट्यात रुग्णालयाच्या इमारतीचे छत कोसळून महिला ठार

विट्यात रुग्णालयाच्या इमारतीचे छत कोसळून महिला ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : इमारतीच्या छतावरील पॅरापेटचा भाग रुग्णालयाच्या शेडवर कोसळून उपचारासाठी आलेली महिला ठार, तर तिची बहीण गंभीर जखमी झाली. अनिता सुरेश माळी (वय ४०, रा. आयटीआयजवळ, विटा) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या बहीण अलका बबन शिंदे गंभीर जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास येथील चौंडेश्वरी चौकातील लेंगरे रस्त्यावर घडली.

येथील चौंडेश्वरी चौकात डॉ. दीपक कुलकर्णी यांचे आशीर्वाद क्लिनिक आहे. या रुग्णालयासमोरच्या जागेत डॉ. कुलकर्णी यांनी पत्र्याचे लोखंडी शेड तयार केले आहे. तेथे उपचारासाठी अनिता माळी व अलका शिंदे आल्या होत्या. रुग्णालयात आतील बाजूस जास्त रुग्ण असल्याने दोघी पत्र्याच्या शेडमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी शेजारच्या महादेव कदम यांच्या इमारतीच्या टेरेसवरील जीर्ण झालेले पॅरापेटचे बांधकाम रुग्णालयाच्या पत्र्याच्या शेडवर कोसळले. त्यात लोखंडी अँगलचे शेड पूर्णपणे जमीनदोस्त झाले. त्याखाली सापडून अनिता माळी व अलका शिंदे गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच अनिता माळी यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी अलका शिंदे यांना पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले. या घटनेने विटा शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद रात्री उशिरा विटा पोलिसांत झाली असून पोलीस निरीक्षक संतोष डोके पुढील तपास करीत आहेत.

Web Title: A woman was killed when the roof of a hospital building collapsed in Vita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.