महिलांनी गृह उद्योग उभारून स्वत:च्या पायावर उभे राहावे : विद्या चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:40 AM2021-02-23T04:40:48+5:302021-02-23T04:40:48+5:30
आष्टा : महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, विविध गृह उद्योग उभारून सहकारी महिलांना उभे करावे, गुणवत्तापूर्ण उत्पादने निर्माण ...
आष्टा : महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, विविध गृह उद्योग उभारून सहकारी महिलांना उभे करावे, गुणवत्तापूर्ण उत्पादने निर्माण करून ती बाजारपेठेत उपलब्ध करावीत, असे प्रतिपादन स्वप्नाली ग्रह उद्योगाच्या संचालिका विद्या चव्हाण यांनी केले.
आष्टा (ता. वाळवा) येथील बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्थेच्यावतीने महिला बचत गटातील महिलांसाठी उद्योग वाढीसाठी मार्गदर्शनप्रसंगी विद्या चव्हाण बोलत होत्या. यावेळी अजय शिंदे व रेश्मा बसुगडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बचत गटाच्या महिलांनी वस्तूंचे व पदार्थांचे स्टॉल लावले होते. या महिलांना प्रशस्तिपत्र देण्यात आले. विद्या चव्हाण यांनी महिलांना मसाले, चटणी, शेवया यासारखे पदार्थ घरी कसे बनवावेत व त्यासाठी बाजारपेठ शोधून पदार्थांची गुणवत्ता कशी टिकवायची याबद्दल मार्गदर्शन केले. आष्ट्यातील महिला गृह उद्योग वाढीसाठी सहकार्य करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.
यावेळी नगरसेविका सारिका मदने, योगिनी तगारे, रेहाना इनामदार, दीपाली सावंत, सपाटे गुरुजी, महादेव झांबरे, मस्के गुरुजी, आब्बास लतीफ, एन. के. जाधव, बी. जी. गायकवाड, जमीर लतिफ, संग्राम शिंदे, अशोक मदने, वसंत कांबळे, शहाजान जमादार, गणेश टोमके व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.