संजयनगर येथे कुत्रा-कुत्रीच्या लग्नाचा अद्भुत सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 03:43 PM2020-12-25T15:43:23+5:302020-12-25T15:44:53+5:30

Dog marriage Sangli -सांगली शहरातील संजयनगर मधील विलास गगणे यांच्या कुटुंबांनी आपल्या कुत्रा-कुत्रीचं लग्न धुमधडाक्यात लावून दिलं. कोरोनामुळे सरकारने घातलेल्या नियमानुसार हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला परिसरातील नागरिक आणि गावकरीही उत्साहानं सहभागी झाले होते.

A wonderful dog-dog wedding ceremony at Sanjaynagar | संजयनगर येथे कुत्रा-कुत्रीच्या लग्नाचा अद्भुत सोहळा

संजयनगर येथे कुत्रा्कुत्रीचा अनोखा लग्न सोहळा संपन्न झाला. (छाया सुरेंद्र दुपटे)

Next
ठळक मुद्देसंजयनगर येथे कुत्रा-कुत्रीच्या लग्नाचा अद्भुत सोहळापरिसरातील नागरिक उत्साहानं सहभागी

सुरेंद्र दुपटे

संजयनगर/सांगली : सांगली शहरातील संजयनगर मधील विलास गगणे यांच्या कुटुंबांनी आपल्या कुत्रा-कुत्रीचं लग्न धुमधडाक्यात लावून दिलं. कोरोनामुळे सरकारने घातलेल्या नियमानुसार हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याला परिसरातील नागरिक आणि गावकरीही उत्साहानं सहभागी झाले होते.

सांगलीतील संजयनगर परिसरातील गगणे कुटुंबांनी घरातील कुत्रा-कुत्रीचं लग्न धुमधडाक्यात लावून द्यायचे ठरवलं. त्याप्रमाणे हा लग्नसोहळाही पन्नास नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलं. शिवाय या पाहुणे मंडळीच्या भोजनाचीही व्यवस्था यावेळी करण्यात आली होती.

आपल्या घरातल्या, मित्रांच्या किंवा माणसांच्या लग्नात जे-जे होतं, ते सगळं या कुत्रा-कुत्रीच्या लग्नात करण्यात आलं. अगदी, 'आमच्या टायगरच्या लग्नाला यायचं हं...' अशा आशयाच्या पत्रिकेपासून ते साश्रु नयनांनी नवरीला निरोप देण्यापर्यंत सगळं या लग्नसोहळ्यात होतं. त्यात मानपान, आहेर, रुखवत हेही आलं बरं!

या अद्भुत विवाहसोहळ्यात वर होता टायगर आणि वधू होती डाँली. त्यांच्या कुटुंबांनी गुरुवारीच या दोघांचा साखरपुडाही थाटात केला होता. त्यानंतर प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी तर गावात आनंदाला उधाणच आलं होतं.

फुलांनी सजवलेल्या कारमधून डॉलीला टायगरच्या घरी नेण्यात आलं. या वरातीत गावकरी संगीताच्या तालावर नाचत होते. मंडपात जेवणाची जोरदार तयारी सुरू होती. वधूच्या कुटुंबीयांनी वरपक्षाचं दणक्यात स्वागत केलं. डॉलीला लाल रंगाची साडी नेसवण्यात आली होती. टायगरही रुबाबदार दिसत होता.

मोजके विधी केल्यानंतर या दोघांनी एकमेकांना हार घातले आणि विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. तोपर्यंत वधू निद्राधीन झाली होती. तिच्या विदाईची वेळ होताच, वधुपक्षाला अश्रू अनावर झाले. त्यांनी डाँलीला प्रेमानं उठवून टायगरच्या गाडीत बसवलं. तिला खाण्या-पिण्याच्या वस्तू आणि आहेरही दिला. त्यानंतर बँडबाजाच्या तालावर टायगर डाँलीची वरात निघाली.

या अनोख्या लग्नाची चर्चा आसपासच्या गावांमध्येही सुरू आहे. यावेळी विशाल कांबळे, विलास गगणे, आक्काताई गगणे, दिपाजंली गगणे, महेश भोरकडे आदी या सोहळ्यास उपस्थित होते.
 

Web Title: A wonderful dog-dog wedding ceremony at Sanjaynagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.