नेर्ले : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात समाज व सामान्य माणसांची कामे झाली आहेत. अन्न सुरक्षा योजनेतून अनेक लोकांना धान्य मिळाले, ‘उज्ज्वला’मधून गॅस दिला गेला, असे मत माजी आ. शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले.
नेर्ले (ता. वाळवा) येथे अन्न सुरक्षा योजना लाभार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. माजी सरपंच जयकर कदम, हणमंत कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवाजीराव नाईक म्हणाले, किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून गुंठ्यामध्ये शेत असणाऱ्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये खात्यावर वर्ग झाले. चांगल्या कामाच्या पाठीवर हात ठेवा. नेर्ले परिसरात आम्ही कोट्यवधीची कामे केली; पण त्याची जाहिरात केली नाही.
माजी सरपंच जयकर कदम म्हणाले, नेर्ले गावचा पाण्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने वनश्री नानासाहेब महाडिक, शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत यांनी प्रयत्न केले; परंतु कामाचे श्रेय घेण्यासाठी काही मंडळींनी खोडा घातला.
हणमंत कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल दळवी यांचा प्रकाश हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या मानद संचालकपदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. एस. व्ही. पाटील, भटवाडीचे सरपंच विजयराव महाडिक, किरण थोरात, भीमराव पाटील, सी. बी. पाटील, संपतराव साळुंखे, पाटील, सुधीर कुंभार आदी उपस्थित होते.
फोटो ओळ- १२०२२०२१-आयएसएलएम-नेर्ले न्यूज
नेर्ले (ता. वाळवा) येथील अन्न सुरक्षा योजना लाभार्थी सत्कार समारंभात माजी आ. शिवाजीराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जयकर कदम, हणमंत कुंभार उपस्थित होते.