शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

कोरोनाविरोधातील महायुद्धाची जिल्ह्यात वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:23 AM

सांगली : कोरोनाने जिल्ह्यावर पहिला फास टाकला, त्याला या महिन्यात वर्ष पूर्ण झाले. २२ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण ...

सांगली : कोरोनाने जिल्ह्यावर पहिला फास टाकला, त्याला या महिन्यात वर्ष पूर्ण झाले. २२ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण सापडला, त्यानंतर आजअखेर जिल्ह्यातील रुग्णसंख्येने ५० हजारापर्यंत मजल मारली आहे. सध्या रुग्णसंख्या अत्यल्प असली तरी नागरिक पुरेसे सावरलेले नाहीत. कोरोनाविरोधातील या महायुद्धाची वर्षपूर्ती झाली आहे.

गेल्या पंधरवड्यापासून रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी (दि. १२) ४३ नवे कोरोनाबाधित सापडले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ५० हून अधिक कोविड सेंटर्स सुरू होती. सध्या पाचच सुरु असली तरी नव्याने सेंटर्स सुरू करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील सेंटरची नुकतीच साफसफाई करुन घेण्यात आली, तर मिरज शासकीय रुग्णालय १ मार्चपासून पुन्हा कोविड सेंटर म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले.

कोरोनाने वर्षभर नाकेबंदी केली, त्राही त्राही करुन सोडले, तरी त्यातून नागरिक शहाणपण घेण्यास तयार नाहीत. बाजारपेठा व रस्त्यांवर मास्क न घालता वावरणारे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे, सॅनिटायझर न वापरणारे नागरिक कोरोनाला पुन्हा आमंत्रण देत आहेत. लसीकरणाला हळूहळू प्रतिसाद मिळू लागला आहे, पण खुद्द आरोग्य कर्मचारी व महसूल प्रशासनातील शंभर टक्के लाभार्थ्यांनी लस टोचून घेतलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊनची शक्यता तूर्त फेटाळली असली तरी दुसऱ्या लाटेची शक्यता मात्र नाकारता येण्यासारखी नाही.

चौकट

कोविड सेंटर्समध्ये अत्यल्प रुग्ण

- सध्या जिल्हाभरात पाच कोविड सेंटर्स सुरू आहेत. मिरज सिव्हिल, भारती, मिरज चेस्ट, सिनर्जी आणि इस्लामपुरातील आधार रुग्णालयात कोरोनाबाधित उपचार घेत आहेत.

- रुग्णसंख्या अत्यल्प असल्याने ही रुग्णालये जवळपास रिकामीच आहेत. अन्य ५० हून अधिक कोविड सेंटर्समध्ये अन्य उपचार सुरु झाले आहेत.

चौकट

रेमडेसिव्हीर, फेव्हीपेरीयरचा पुरेसा साठा

कोरोनासाठी डॉक्टरांचे अस्त्र ठरलेली रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स व फेव्हीपेरीयर गोळ्यांचा पुरेसा साठा जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे आहे. किंबहुना रुग्ण अत्यल्प असल्याने त्यांच्या तुटवड्याचा प्रश्नच निर्माण झालेला नाही. वापरही मोजकाच सुरू आहे. याव्यतिरिक्त अन्य अैाषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

चौकट

पहिला पॉझिटिव्ह सध्या ठणठणीत

- परदेशातून धार्मिक स्थळावरून आलेल्या इस्लामपुरातील कुटुंबात पहिला कोरोना रुग्ण सापडला. लक्षणे जाणवल्याने चाचणी केली असता कोरोनाची लागण स्पष्ट झाली. सध्या हा रुग्ण ठणठणीत आहे.

- त्यानंतर इस्लामपूर शहरात एकापाठोपाठ एक २४ जण बाधित झाले. या सर्वांना मिरज कोविड रुग्णालयात दाखल केले गेले. तेथे अत्यंत काळजीपूर्वक उपचार झाल्याने सर्व कोरोनाबाधित सहीसलामत बरे झाले.

- सामान्य नागरिक, प्रशासन व आरोग्य यंत्रणा या सर्वांसाठीच हा आजार पूर्णत: नवा असल्याने सारेच गोंधळात होते. पण मिरज रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी या सर्वांनी धीर दिला. आत्मविश्वास जागविला. यातून सर्व कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले.

ग्राफ

असे वाढले रुग्ण

१ मार्च २०२० - ०, १ एप्रिल - २५, १ मे - २००, १ जून - ११२, १ जुलै - ३८४, १ ऑगस्ट - २६४३, १ सप्टेंबर - १२३९४, १ ऑक्टोबर - ३६८१४, १ नोव्हेंबर - ४५०८५, १ डिसेंबर - ४६७८३, १ जानेवारी २०२१ - ४७६१२, १ फेब्रुवारी - ४८१०५, १ मार्च - ४८५३८

पॉईंटर्स

- जिल्ह्यातील पहिला रुग्ण आढळला - २२ मार्च २०२०

- कोरोनाचे एकूण रुग्ण - ४८,८६६

- बरे झालेले रुग्ण - ४६,७७६

- एकूण कोरोना बळी - १,७६५

- सध्या उपचार सुरु असलेले रुग्ण - ३२५

- कोविड सेंटर्स संख्या - ५