महाराष्ट्रासाठी यशवंतरावांचे योगदान मोलाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:50 AM2021-03-13T04:50:42+5:302021-03-13T04:50:42+5:30

ओळ : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार अरुण लाड, पोपट मोरे यांनी अभिवादन केले. ...

Yashwantrao's contribution is invaluable for Maharashtra | महाराष्ट्रासाठी यशवंतरावांचे योगदान मोलाचे

महाराष्ट्रासाठी यशवंतरावांचे योगदान मोलाचे

Next

ओळ : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार अरुण लाड, पोपट मोरे यांनी अभिवादन केले.

फाेटाे : १२ देवराष्ट्रे ३

ओळ : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघरात युवा नेते जितेश कदम यांनी अभिवादन केले. यावेळी सरपंच प्रकाश मोरे, पोपट महिद उपस्थित हाेते.

देवराष्ट्रे : महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळेच आज आपण नावीन्यपूर्ण पुराेगामी विचारांचा महाराष्ट्र पाहत आहाेत, असे प्रतिपादन आमदार अरुण लाड यांनी केले.

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, युवा नेते जितेश कदम, तहसीलदार शैलेजा पाटील, सरपंच प्रकाश मोरे यांच्यासह यशवंतरावप्रेमी उपस्थित होते.

यावेळी अरुण लाड म्हणाले, मातोश्री विठामाता यांच्या संस्कारातून यशवंतराव चव्हाण घडले. त्यांनी नक्षलवादी चळवळ माेडित काढण्यासह अल्पसंख्याकांचे प्रश्न, बहुजन समाजाची जबाबदारी, बेरोजगारांची समस्या अशा प्रश्नावर लोकसभेत जे विचार व्यक्त केले ते त्यांच्या दूरदृष्टीची साथ देतात. वेगवेगळ्या देशांच्या विविध स्तरातील अधिकार वर्गाचा सहवास, त्या देशातल्या लोकजीवनाची ओळख, त्यामुळे यशवंतरावांचे स्वदेशावरील प्रेम अधिक डोळस होत गेले. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे महाराष्ट्राची दिल्लीत स्वतंत्र ओळख निर्माण झाली. सुसंस्कृत पुरोगामी व निष्कलंक नेतृत्व असणारे यशवंतराव चव्हाण तरुणांना नेहमी प्रेरणादायी ठरतील.

यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघरात व पूर्णाकृती पुतळ्यास आमदार अरुण लाड, प्रांतधिकारी गणेश मरकड, तहसीलदार शैलजा पाटील, जितेश कदम यांनी अभिवादन केले. यशवंतराव हायस्कूल, यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य, ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोहनराव मोरे, पोपट महिंद, दिनकर पवार, आनंदराव मोरे, बापूसाहेब पाटील, बी. के. शिंदे, कैलास शिरतोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Yashwantrao's contribution is invaluable for Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.