पेठमध्ये यात्रा साध्या पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:26 AM2021-03-18T04:26:14+5:302021-03-18T04:26:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क : पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारी श्री खंडेश्वर व श्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क :
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारी श्री खंडेश्वर व श्री माणकेश्वर यात्रा या वर्षी कोरोनामुळे शासनाच्या नियमावलीमुळे रद्द करण्यात आली होती; परंतु ग्रामपंचायत आणि पोलीस यांच्या नेटक्या नियोजनामुळे धार्मिक विधी करून साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
महाशिवरात्रीपासून पाच दिवस गावातील दोन्ही मंदिर बंद होती. गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. ग्रामस्थांनी कोणत्याही पै-पाहूणे बोलाऊ नये, अशी सूचना दिली होती. पाच दिवस ही यात्रा साध्या पद्धतीने पार पडली. यासाठी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी नारायण देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, जिल्हा परिषद सभापती जगन्नाथ माळी, सरपंच मीनाक्षी महाडिक, उपसरपंच चंद्रकांत पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष धनपाल माळी, शंकर पाटील, राहुल पाटील, नामदेव भाबुरे, शहाजी चव्हाण, सयाजी कदम, विकास दाभोळे, ग्रामविकास अधिकारी एस. ए. चव्हाण, मंडल अधिकारी सुरेश शेळके, तलाठी राहुल काळे तसेच देवस्थान समितीने योगदान दिले.