शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM वरून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावले; म्हणाले, “पराभूत झाल्यावर आता...”
2
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस-पवार दिल्ली दौऱ्यावर, शिंदेना गृहमंत्रालय मिळणार की नाही?
3
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखडा यांच्यावर निशाणा
4
परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड; आंदोलन पुन्हा चिघळल्याने जमावबंदीचे आदेश 
5
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
6
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
7
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'
8
कोण आहेत सिरियाचे नवे पंतप्रधान मोहम्मद अल-बशीर? मार्च २०२५ पर्यंत पदावर राहणार, जाणून घ्या...
9
'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा ... तुमच्या व्हॉट्सॲप स्टोरेजचे टेन्शन होईल दूर!
10
परभणीत आंदोलन चिघळले, सुप्रिया सुळेंकडून निषेध व्यक्त; कठोर कारवाईची केली मागणी
11
मोठा निष्काळजीपणा! रुग्णालयात १० वर्षीय मुलाला 'O' पॉझिटिव्ह ऐवजी दिलं 'AB+' रक्त अन्...
12
Bobby Deol : "माझ्यामुळे कुटुंबाने कठीण काळ पाहिला" म्हणत बॉबी झाला भावुक; सनी देओलने पुसले अश्रू
13
२०० प्लस टार्गेट! फिफ्टी हुकली; पण Prithvi Shaw च्या भात्यातून आली 'एकदम कडक' खेळी
14
राहुल गांधींनी अचानक घेतली लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट, विषय काय?
15
"बांगलादेश ऐकत नसेल तर हिंदूंच्या रक्षणासाठी...!" RSS चं मोदी सरकारला आवाहन
16
“...तर त्याचे परिणाम भोगावे लागतील”; परभणीत आंदोलन चिघळले, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
17
“‘हे’ ३ मुद्दे भाजपाला खूपच अस्वस्थ करतात, EVMबाबत सुप्रीम कोर्टात जाणार”: प्रणिती शिंदे
18
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी शिंदेंच्या शिलेदाराकडून काढली; फडणवीसांकडून नवी नियुक्ती
19
फेअरनेस क्रीमने चेहरा गोरा झाला नाही; न्यायालयाने ठोठावला १५ लाखांचा दंड, ७९ रुपयांची होती खरेदी
20
SMAT 2024, BRD vs BEN : भावाच्या कॅप्टन्सीत हार्दिकनं दाखवली गोलंदाजीतील ताकद; मग संघाला मिळालं सेमीचं तिकीट

कलाकार मानधनचे लाभार्थी शोधासाठी धावाधाव, राज्यात सर्वाधिक सांगलीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2024 12:04 PM

मृत कलाकारांच्या वारसांना संपर्काचे आवाहन

सांगली : कलाकार मानधन योजनेतील पात्र लाभार्थींच्या शोधासाठी जिल्हा परिषदेची धावाधाव सुरू झाली आहे. मानधन योजनेची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. पण शहरी भागातील लाभार्थी कसे शोधायचे? असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबवली जाणारी ही योजना सध्या ग्रामपंचायत विभागाकडे सोपविण्यात आली आहे. या विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघटनेने ही योजना स्वीकारण्यास नकार दिला होता. या वादात सुमारे वर्षभर मानधन रखडले होते. सध्या मात्र नियमित मिळत असल्याची माहिती कलाकार निवड समितीचे अध्यक्ष विजय कडणे यांनी दिली. यादरम्यान, या योजनेचे हयात लाभार्थी शोधण्याची सूचना शासनाने जिल्हा परिषदेला दिली आहे. त्यानुसार माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पण शहरी भागातील लाभार्थी कसे शोधायचे? असा प्रश्न प्रशासनापुढे आहे.शहरात जिल्हा परिषदेची यंत्रणा नाही, तर महापालिकेकडे कलाकार मानधन योजनेच्या नोंदी नाहीत. या स्थितीत जिल्हा परिषदेने बॅंकांकडे कार्यरत खात्यांची माहिती मागितली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत निवड समितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे कलाकारांचे प्रस्ताव निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

मुंबईपेक्षा सांगली आघाडीवरराज्यात सर्वाधिक म्हणजे १८०० हून अधिक लाभार्थी सांगली जिल्ह्यात आहेत. मुंबईत सुमारे १२०० आहेत, त्या तुलनेत सांगली आघाडीवर आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्याच्या कलाकार निवड समित्यांनी ही योजना सर्वसामान्य कलाकारांपर्यंत पोहोचविल्याचा फायदा झाला आहे. कलाकारांना महिन्याला सरसकट पाच हजार रुपये मानधन मिळते.

निवडणूक काळात योजनेची नोंदणी काही काळ रेंगाळली होती. सध्या लिंक खुली होईल, तेव्हा पात्र कलाकारांनी मानधनासाठीचे प्रस्ताव सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन स्वरूपात दाखल करावेत. कलाकाराचे निधन झाले असल्यास त्याच्या पत्नीने मृत्यूच्या दाखल्यासह संपर्क करावा. वारसदार म्हणून पत्नीच्या नावे मानधन सुरू होते. - विजय कडणे, अध्यक्ष, कलाकार मानधन निवड समिती

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद