जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४२५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:47 AM2021-09-10T04:47:27+5:302021-09-10T04:47:27+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कधी कमी तर कधी वाढत आहेत. मात्र, चारशेच्या खाली आकडा अद्याप आला नाही. त्यामुळे ...
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कधी कमी तर कधी वाढत आहेत. मात्र, चारशेच्या खाली आकडा अद्याप आला नाही. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. गुरुवारी आलेल्या अहवालामध्ये ४२५ जण बाधित आढळून आले असून, यामध्ये चारजणांचा कोरोनामुळे बळी गेला.
जिल्ह्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. बाजारपेठाही गर्दीने हाऊसफुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालामध्ये ४२५ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले.
तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे.
जावळी ४, कऱ्हाड ४१, खंडाळा १३, खटाव ९४, कोरेगांव ३५, माण ४८, महाबळेश्वर १, पाटण ११, फलटण ८२, सातारा ७५, वाई १३, व इतर ८ जणांचा समावेश आहे.
तसेच मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या कऱ्हाड १, कोरेगांव २ आणि फलटणमधील एकाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४४ हजार ९२६ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, ६ हजार ११ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे तसेच आतापर्यंत २ लाख ३१ हजार ६२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ८ हजार ७६७ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.