निरा खोऱ्यातील धरणात ४८ टीएमसी पाणीसाठा .....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 03:46 PM2020-10-19T15:46:08+5:302020-10-19T15:47:47+5:30
dam, rain, sataranews निरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा या वर्षी वाढला आहे . ऑक्टोबर अखेर असताना नीरा खोऱ्यातील चारही धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे . त्यामुळे सर्वच धरणे ओव्हरफ्लो झालेले आहेत . नीरा खोऱ्यातील चार धरणात सुमारे ४८ टीएमसी पाणीसाठा झाल्याने साहजिकच यापुढील काळात शेती सिंचनात कोणतीही अडचण राहणार नाही . त्यामुळे शेतकरी वर्गासाठी समाधानाची बाब आहे .
खंडाळा : निरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा या वर्षी वाढला आहे . ऑक्टोबर अखेर असताना नीरा खोऱ्यातील चारही धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे . त्यामुळे सर्वच धरणे ओव्हरफ्लो झालेले आहेत . नीरा खोऱ्यातील चार धरणात सुमारे ४८ टीएमसी पाणीसाठा झाल्याने साहजिकच यापुढील काळात शेती सिंचनात कोणतीही अडचण राहणार नाही . त्यामुळे शेतकरी वर्गासाठी समाधानाची बाब आहे .
नीरा खोर्यातील नीरा देवधर, भाटघर , वीर व गुंजवणी या चारही धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत शंभर टक्के आहे . यावर्षी नीरा खोर्यातील नीरा देवधर ११ .७२९ टीएमसी , भाटघर २३ .५०२ टीएमसी ,वीर धरणात ९ .४०८ टीएमसी व गुंजवणी धरणात ३ .६९० टीएमसी एवढा पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरला आहे. चारही धरणात मिळून एकूण ४८ .३२९ टीएमसी एवढा मुबलक पाणीसाठा झाला आहे .
नीरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा भरमसाठ झाल्याने पुढील काळात शेतीसाठी त्याचा उपयोग होणार आहे . नीरा खोऱ्यातील धरणाच्या पाण्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील खंडाळा , फलटण तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तसेच पुणे जिल्हयातील पुरंदर , बारामती ते इंदापूरपर्यंत होत असतो .
येथील शेती याच पाण्यावर अवलंबून असते. यावर्षी पाणीसाठा मुबलक असल्याने धरणांच्या कालव्याला आवर्तने वेळेवर सोडणे शक्य होणार आहे . त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न उरणार नाही .