नितीन काळेल सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळपासून उत्साहात मतदान सुरू असून पहिल्या दोन तासात सरासरी ७ टक्के मतदान झाले. तर या निवडणुकीमुळे अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा दिसून आल्या.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदानाचा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी ७ ते ९ या दोन तासात मतदारसंघात सरासरी ७ टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली आहे.