चहा प्यायला थांबला, ..अन् चोरट्यांनी ट्रॅक्टरच लांबवला; साताऱ्यातील घटना

By नितीन काळेल | Published: March 31, 2023 06:19 PM2023-03-31T18:19:46+5:302023-03-31T18:21:24+5:30

सातारा : साखर कारखान्यावर ऊस सोडून माघारी येताना चहा पिण्यास थांबल्यावर ट्रॅक्टर-ट्राॅलीची चोरी करण्यात आली. ही घटना सातारा शहराजवळ ...

A tractor trolley theft took place in the limits of Sangam Mahuli in Satara | चहा प्यायला थांबला, ..अन् चोरट्यांनी ट्रॅक्टरच लांबवला; साताऱ्यातील घटना

संग्रहित छाया

googlenewsNext

सातारा : साखर कारखान्यावर ऊस सोडून माघारी येताना चहा पिण्यास थांबल्यावर ट्रॅक्टर-ट्राॅलीची चोरी करण्यात आली. ही घटना सातारा शहराजवळ घडली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रकरणी कृष्णात मुरलीधर थोरात (रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार विठ्ठल कदम (पूर्ण नाव नाही रा. आरळे, ता. सातारा) आणि अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंद झालेला आहे. दि. २४ जानेवारीला सकाळी साडेनऊच्या सुमारास संगम माहुली गावच्या हद्दीत ट्रॅक्टर-ट्राॅली चोरीचा प्रकार घडला. 

ट्रॅक्टरचा चालक युवराज जगन्नाथ थोरात (रा. कोर्टी, ता. कऱ्हाड) हा कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ऊस सोडून माघारी सातारामार्गे येत होता. उंब्रजला जात असताना तो संगम माहुली हद्दीत रस्त्याच्या बाजूला ट्रॅक्टर-ट्राॅली उभी करून चहा पिण्यासाठी खाली उतरला. चहा घेण्यास थांबल्यावर संशियतांनी ट्रॅक्टर-ट्राॅली चोरून नेली. याची किंमत पाच लाख रुपये होती.

दरम्यान, ट्रक्टर- ट्राॅलीचा प्रकार घडल्यानंतर ३० मार्च रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: A tractor trolley theft took place in the limits of Sangam Mahuli in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.