पिंपोडे बुद्रुक : पुणे कात्रज येथे एड्सग्रस्त बालकांसाठी काम करणाºया ममता फाउंडेशनमधील मुलांना उद्योजक दीपक निकम यांच्यामुळे सोळशी येथील डोंगरमाथ्यावर वसविलेल्या वेदी कृषी पर्यटन केंद्राची सफर घडली. यामुळे मुलांच्या चेहऱ्यांवर खुललेले हास्य क्षणभर दु:ख दूर लोटून गेले.
जगण्याची कला अवगत होण्यापूर्वीच एड्स झालेल्या बालकांना जीवनाची उभारी देण्याचे काम कात्रजमधील ममता फाउंडेशनच्या वतीने केले जाते. आजाराची यातना भोगत जगणाºया या मुलांना सर्वसामान्य मुलांसारखे जगण्याची अनुभूती मिळावी, या हेतूने सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक दीपक निकम यांनी स्वखर्चाने आपल्या सोळशीमधील डोंगरमाथ्यावर साकारलेल्या वेदी कृषी पर्यटन केंद्राची सफर घडविली. यावेळी या मुलांनी रेन डान्स, झुलता पूल, स्विमिंग, इन-आऊट डोअर गेम्स, झोपाळा, शिवार फेरफटका याचा यथेच्छ आनंद लुटला.या ठिकाणी मुलांसाठी मोफत नास्ता, जेवण, राहण्याची सोय करण्यात आली होती. दुर्दम्य आजाराच्या यातना विसरून शहराबाहेर निसर्गाच्या सानिध्यात आलेल्या मुलांच्या चेहºयावर येथील निसर्ग सौंदर्यासह आदरतिथ्याविषयीची आनंदी छटा पाहावयास मिळाली. यावेळी मुलांनी मनसोक्त फिरण्याचा आनंद घेतला. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवताना आनंद चेहºयावर दिसत होता.
अगदी जन्मापासून एचआयव्ही संक्रमण असलेली ६ ते २० वयोगटातील ३५ मुलामुलींचा सांभाळ गेल्या ११ वर्षांपासून ममता फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे. मुलांच्या राहणीमानापासून शिक्षणापर्यंतचा खर्च या फाउंडेशनकडून करण्यात येतो. सामाजिक कार्यकर्ते दीपक निकम यांच्यासारख्या असंख्य दानशूर व्यक्तीच्या सामाजिक सहभागामुळे अशा मुलांसाठी काम करण्याचा उत्साह द्विगुणित होत आहे, असे ममता फाउंडेशनच्या अध्यक्षा शिल्पा बुडूक यांनी सांगितले.
स्वत:ची काहीही चूक नसताना केवळ नियतीच्या क्रूरतेमुळे निरागस चेहºयावरील आनंद मावळला होता. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने त्यांना आधार देणे, दु:ख विसरावे म्हणून आनंद देणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आम्ही या मुलांना पर्यटन केंद्रात मोफत सुविधा दिली.- दीपक निकम, उद्योजक वेदी फार्मआमच्यावर ओढविलेल्या परिस्थितीमुळे आम्ही कुटुंबापासून दुरावलो असताना ममता फाउंडेशनने दिलेले प्रेम अवर्णनीय आहे. आम्हा मुलांना या ठिकाणावरून मिळालेला आनंद कधीही न विसरता येण्यासारखा आहे.-निकिता.सोळशी येथील वेदी फार्ममध्ये मंगळवारी पोहण्याचा आनंद ममता फाउंडेशनमधील मुलांनी घेतला.