लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मंगळवार, दि. २ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. यंदाही लोणंद येथे दीड दिवसाचा मुक्काम असणार आहे. सोहळ्यातील वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सर्वच यंत्रणांनी कंबर कसली आहे. सध्या सातारा बांधकाम विभागाची अनेक कामे उरकण्याची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
खंडाळा व लोणंद सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पर्यायी रस्त्यांवरील खड्डे मुजविण्याचे व वाहतुकीस अडथळा ठरणाºया झांडांच्या फांद्या तोडण्याचे काम केले जात आहे. नीरा ते लोणंद या सात किलोमीटर अंतराच्या पालखी मार्गाचे पालखी महामार्ग विभागाकडून मुरूम टाकून रस्त्यांच्या दोन्ही बाजूकडील साईडपट्ट्या भरण्याचे काम सुरू आहे. पर्यायी रस्त्यांवरील खड्डे मुजवून वाहतुकीस अडथळा ठरणाºया झाडांच्या फांद्या तोडण्यात येत आहेत.
लोणंद येथील पालखी तळावर पालखी ठेवण्यासाठी नव्याने आकर्षक असा पालखी कट्टा बांधण्यात आला आहे. त्याच्यासमोरील सभा मंडपासाठी फरशी बसविण्यात आली आहे. पालखीनिमित्त लोणंद शहरातून जाणाºया रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता चकाचक करण्यात आला आहे. पालखी तळावर शौचालयासाठी लागणाºया सेफ्टी टँकचे काम पूर्ण करण्यात आले आहे.कर्नाटकाच्या अश्व दिंडीचे भरतगाववाडीत आगमननागठाणे : भरतगाववाडीला अनेक वर्षांचा धार्मिक, अध्यात्मिक कार्याचा वारसा लाभला आहे. पंढरीच्या विठूरायाच्या भेटीस आषाढी वारीसोबत जाणाºया प्रमुख दिंडीसहित आणखी तीन दिंड्यांचे भरतगाववाडीत आगमन होते. यातीलच कर्नाटकातून येणारी आणि आळंदीमार्गे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पाठीवर घेऊन जाणारी मानाची अश्व दिंडी मंगळवारी भरतगाववाडीत दाखल झाली. मानाच्या अश्वांचे दर्शन घेण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी गर्दी केली.
दिंडीतील सर्व वारकºयांच्या मुक्कामाच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात दोन्ही अश्वांसहित सर्वतोपरी नियोजन करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी शितोळे सरकार यांच्या दिंडीतील मानाच्या अश्वांचे गावात आगमन झाल्यानंतर त्यांची पूजा करून गावातून दोन्ही अश्वांची ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात दिमाखात मिरवणूक काढण्यात आली. या दिंडीसाठी डॉ. जगन्नाथ पडवळ, शरद इंगळे, बाळकृष्ण इंगळे यांच्याकडून विशेष सेवा पुरवली जाते. यासाठी दिलीप पडवळ, भानुदास तोडकर, विलासराव घाडगे, बाबूराव काटकर, प्रदीप काटकर, अमर पडवळ, रोहन इंगळे, साहिल चव्हाण, महेश मोहिते आदींनी परिश्रम घेतात.माऊलींच्या रिंगणात या अश्वांना प्रमुख स्थानसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत माऊलींच्या पादुका पाठीवर वाहून घेऊन जाणाºया मानाच्या प्रमुख अश्वांची दिंडी एक दिवस भरतगाववाडी येथे मुक्कामी असते. तसेच आषाढी वारीमध्ये लोणंद, तरडगाव, वाखरी येथे होणाºया रिंगणांमध्ये या अश्वांना मानाचे स्थान आहे. या दिंडीच्या एक दिवस आधी हुबळी, धारवाडमधून येणारी एक आणि कर्नाटक येथीलच आणखी दोन अशा सर्व मिळून चार दिंड्या असतात.
लवकरच पालखी तळावरील खड्डे मुरूम टाकून मुजविण्यात येणार आहेत. तसेच पालखी तळावर पावसामुळे चिखल होऊ नये म्हणून ३० जूनपूर्वी बारीक कच टाकून तळाचे सपाटीकरण करण्यात येणार आहे.-पांडुरंग मस्तूद, शाखा अभियंता, लोणंद
सार्वजनिक बांधकाम विभागाने लोणंद नगरपंचायत व लोणंद पोलिसांच्या सहकार्याने मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. येत्या २१ तारखेला तहसिलदारांच्या अध्यक्षेतेखाली अतिक्रमण मोहीम राबविण्यात येणार आहे.-एम. वाय. मोदी, उपअभियंता, खंडाळा