आॅनलाईन सातबारासाठी १५ रुपये मोजावे लागणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 08:59 PM2019-02-13T20:59:10+5:302019-02-13T21:00:10+5:30
सातारा : डिजिटल सातबारा उतारा आॅनलाईन काढण्यासाठी १५ रुपये मोजावे लागणार आहेत. यातील दहा रुपये हे तलाठ्यांना मिळणार असून, ...
सातारा : डिजिटल सातबारा उतारा आॅनलाईन काढण्यासाठी १५ रुपये मोजावे लागणार आहेत. यातील दहा रुपये हे तलाठ्यांना मिळणार असून, राज्य सरकारच्या तिजोरीत ५ रुपयांची भर पडणार आहे.
राज्य शासनाने सातबारा उतारा डिजिटल करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उतारा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यात सुमारे अडीच कोटी सातबारा उतारे आहेत. आतापर्यंत ५० लाखांहून अधिक साताबाराचे डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. तर डिजिटायझेशन पूर्ण झालेले आणि त्यावर स्वाक्षरी असणारा सातबारा उतारा आॅनलाईन माध्यमातून शेतकºयांना देण्यात येत आहेत. त्यासाठी काही प्रमाणात शुल्क आकारण्यात येत होते. त्याची निश्चिती नव्हती. आता मात्र सातबारासाठी १५ रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही लवकरच करण्यात येणार आहे.
साताºयात १४ लाख उतारे...
सातारा जिल्ह्यात १४ लाख २३ हजार ९६९ सातबारा उतारे आहेत. नेहमी काही ना काही कारणांसाठी सातबारा लागतोच. तर दररोज बँक, सोसायटी, पतसंस्था, इतर कर्जप्रकरणे व अन्य कामांसाठी ५० हजारांच्या वर उतारे काढण्यात येतात. या माध्यमातून शासनाला ५ रुपयांप्रमाणे अडीच लाखांच्यावर महसूल प्राप्त होणार आहे. तर तलाठ्यांनाही लॅपटॉप, प्रिंटर, शाई, कागद, वीज आदींसाठी १० रुपये प्रति सातबारामागे मिळणार आहेत.