Satara: बायको अन् मुलाला पाठवत नसल्याचा राग, गाडी अंगावर घालून आजे सासूचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 01:25 PM2024-05-15T13:25:21+5:302024-05-15T13:25:39+5:30

खटाव : खटाव तालुक्यातील दरोज येथे बायको आणि बाळास तिच्या माहेरचे नातेवाईक पाठवत नाहीत, या रागातून आजे सासूच्या अंगावर ...

Anger of not sending wife and child, mother in law killed by car in Khatav Satara | Satara: बायको अन् मुलाला पाठवत नसल्याचा राग, गाडी अंगावर घालून आजे सासूचा खून

Satara: बायको अन् मुलाला पाठवत नसल्याचा राग, गाडी अंगावर घालून आजे सासूचा खून

खटाव : खटाव तालुक्यातील दरोज येथे बायको आणि बाळास तिच्या माहेरचे नातेवाईक पाठवत नाहीत, या रागातून आजे सासूच्या अंगावर गाडी घालण्यात आली. यामध्ये जखमी आजे सासूचा सोमवार, दि. १३ रोजी सांगली येथे मृत्यू झाला. याप्रकरणी जावई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालन शंकर आवळे असे खून झालेल्या आजे सासूचे नाव असून सागर उमापे असे गाडी घातलेल्या जावयाचे नाव आहे.

मुलीची आई सीमा विठ्ठल लोखंडे यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार खुनाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या तक्रारीवरून पुसेगाव पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सीमा विठ्ठल लोखंडे यांचे राहते घरासमोरील रस्त्यावर त्यांचा जावई सागर संपत उमापे (मुळ रा. राजाचे कुर्ले ता. खटाव जि. सातारा, सध्या रा. गंगापूर शिवनगर, आनंद कॉलनी नाशिक) याने पत्नी आणि बाळाला सासरचे मंडळी पाठवत नाहीत, या कारणावरून चिडून घरातील लोकांशी भांडण केले. तसेच पत्नीची आजी शालन शंकर आवळे (वय ५३) यांच्याकडे रागात बघून ‘जे होतंय ते ह्या म्हातारी मुळेच होतय हिला जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणून त्याचे ताब्यातील कार (एमएच ४७ एन १९३३) ही चालू करून गाडी पाठीमागे घेऊन पुन्हा गाडी जोरात पुढे घेऊन तिचे अंगावर घातली. 

यात शालन आवळे यांना गंभीर जखमी केले होते. गंभीर अवस्थेत जखमी असलेल्या शालन शंकर आवळे यांना तातडीने सांगली येथे उपचारासाठी नेण्यात आले. यादरम्यान त्यांचा सांगली येथील रुग्णालयात सोमवार, दि. १३ रोजी मृत्यू झाला. त्यानंतर खुनाच्या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Web Title: Anger of not sending wife and child, mother in law killed by car in Khatav Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.