कराडात घरपोच सेवा देण्यासाठी व्यावसायिकांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:04 AM2021-05-05T05:04:14+5:302021-05-05T05:04:14+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत; मात्र जीवनावश्यक वस्तू ...
कोरोनाचा प्रादुर्भाव सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत; मात्र जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या गोष्टी लोकांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्या घरपोच सेवेने मिळाव्यात, अशी योजना आखली आहे. दूध, किराणा, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या व्यावसायिकांना हा माल घरपोच द्यावा लागणार आहे. त्याची परवानगी कराड पालिकेत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सुमारे तीनशे व्यावसायिकांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तसे अर्ज दाखल केले आहेत.
घरपोच सेवा देणाऱ्या व्यावसायिकांची कोरोना चाचणी करूनच त्याला तशी परवानगी देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.