तृणधान्याची गावोगावी होणार जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:21 AM2021-03-30T04:21:46+5:302021-03-30T04:21:46+5:30
यावेळी पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत ...
यावेळी पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, तालुका कृषी अधिकारी मुल्ला, माजी नगरसेवक गंगाधर जाधव यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी तृणधान्य खाणे आरोग्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगून जनजागृती उपक्रमास प्रारंभ केला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काळे यांनी या मोहिमेचा उद्देश सांगितला. ही जनजागृती फेरी गावोगावी जाणार असून शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये तृणधान्याविषयी आवड निर्माण केली जाणार आहे. उपविभागीय कृषी अधिकारी चव्हाण यांनी स्वागत केले. तालुका कृषी अधिकारी मुल्ला यांनी आभार मानले.
फोटो : २९केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते तृणधान्य जागृती फेरीस प्रारंभ करण्यात आला. (छाया : अरमान मुल्ला)