कर्करोग जनजागृतीसाठी डॉक्टरांच्यात हाती बॅट-बॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:11 AM2021-02-18T05:11:53+5:302021-02-18T05:11:53+5:30
सातारा : नेहमीच हातात स्टेथेस्कोप घेऊन फिरणाऱ्या डॉक्टरांनी चक्क हातात बॅट आणि बॉल घेऊन मैदानावर क्रिकेटचा आनंद लूटला. कर्करोग ...
सातारा : नेहमीच हातात स्टेथेस्कोप घेऊन फिरणाऱ्या डॉक्टरांनी चक्क हातात बॅट आणि बॉल घेऊन मैदानावर क्रिकेटचा आनंद लूटला. कर्करोग जनजागृतीसाठी साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या वतीने या तीन दिवसीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.
या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातूनही सहभागी डॉक्टर्सने कर्करोगाविषयी जनजागृती केली. नागरिकांमध्ये असलेली कर्करोगाविषयीची भीती दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. या स्पर्धेत १० संघ सहभागी झाले असून, सातारा जिल्ह्यातील १४० डॉक्टर्स मैदानात उतरले होते. ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष उदय देशमुख, आयएमए सातारा, जीपी असोसिएशन सातारा, इंडियन डेंटल असोसिएशन सातारा रुरल हॉस्पिटल, नीमा असोसिएशन, आयुर्वेदिक संमेलन, आयुर्वेद व्यासपीठ अशा विविध असोसिएशनचे प्रेसिडेंट सेक्रेटरी आणि पदाधिकारी या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.
ऑन्को लाईफ चॅम्पियन ट्रॉफी २०२१ कमिटीचे प्रमुख सचिन देशमुख, डॉ. अनिकेत विभूते, डॉ. विश्वजित बाबर, डॉ. विक्रांत माने-पाटील, डॉ. मनोज तेजानी, डॉ. अनिरुद्ध जगताप यांनी या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन केले. तीन दिवसीय सामन्यांमध्ये एकूण १६ मॅचेस झाल्या असून, मेडिकल ऑन्को वॉरिअर हा संघ विजयी ठरला, तर कोअर डायग्नोस्टिक डेअर डेव्हिल्स हा संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. डॉ. अनिरुद्ध जगताप यांचा सौजन्याने या मैचेस गौरीशंकर कॉलेज ऑफ फार्मसी मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या.
फोटो आहे
फोटो कैप्शन - मेडिकल ऑन्को वॉरियर्स यांना ट्रॉफी देताना ऑन्को लाईफचे अध्यक्ष उदय देशमुख