शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्यास सुवर्णयुगाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:21 AM2021-03-30T04:21:42+5:302021-03-30T04:21:42+5:30

येथील गाडगे महाराज महाविद्यालयात ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमात आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या ...

The beginning of the golden age if the problems of the farmers are solved | शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्यास सुवर्णयुगाची सुरुवात

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्यास सुवर्णयुगाची सुरुवात

Next

येथील गाडगे महाराज महाविद्यालयात ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमात आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य संभाजी सावंत होते. डॉ. अभय पाटील, प्रा. विश्वनाथ पवार, प्रा. धनाजी खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.

नेताजी सूर्यवंशी म्हणाले, भारतात पूर्वी सुबत्ता होती. अनेकांनी देशातील संपत्ती लुटून नेली. अनेक दुष्काळ सहन केलेल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा स्थितीत देशाने कृषी क्षेत्रात अनेक मापदंड निर्माण केले आहेत. क्षेपणास्त्र क्षेत्रात तसेच अवकाश संशोधनात देशाची कामगिरी महत्वपूर्ण आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात आपण पाय रोवून उभे आहोत. मात्र, शैक्षणिक मूल्ये आणि गुणवत्ता यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे.

प्रा. डॉ. इंद्रजित ढोले, प्रा. डॉ. अनंत निकम, प्रा. डॉ. संदीप महाजन, प्रा. अर्तुन पवार, प्रा. अश्विनी तातुगडे, प्रा. स्वाती भोंगळे उपस्थित होते. मराठी विभागातील प्रा. डॉ. रेश्मा दिवेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पल्लवी खैरमोडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. सचिन जाधव यांनी आभार मानले.

Web Title: The beginning of the golden age if the problems of the farmers are solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.