या निवडणुकीत ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनलमधून श्रीकांत रामचंद्र पवार, मधुकर दादू देशमख, अंजना प्रकाश पवार, सुरेखा नारायण पवार, सुनीता सुनील पवार, लतादेवी दिपक पवार, राजाराम दिनकर भिसे, शिवाजी श्यामराव जाधव, सविता हणमंत कचरे हे उमेदवार विजयी झाले असून, या सर्व विजयी उमेदवारांसह ग्रामस्थांनी मंत्री बाळासाहेब पाटील यांची कऱ्हाड येथील संपर्क कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी नूतन सदस्यांचा सत्कार केला.
यावेळी बाळासाहेब पाटील म्हणाले, आपापसांतील मतभेद विसरून सर्वांनी गावच्या विकासासाठी एकत्र यावे. तसेच गावच्या जेष्ठ ग्रामस्थांच्या सल्ल्याने गावचा कारभार करावा. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे संचालक बजरंग पवार, पॅनलप्रमुख प्रदपी भार्गव पवार, रमेश पाटील, पिराजी पवार, व्यंकटराव देशमुख, भार्गव धनाजी पवार, बापूराव पवार, विजयकुमार पाटील, शिवाजी पवार, अशोक हणमंत पवार, मारुती पवार आदी उपस्थित होते.
फोटो : २२केआरडी०२
कॅप्शन : बेलवडे हवेली, ता. कऱ्हाड येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळविलेल्या उमेदवारांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. यावेळी नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.