वरकुटे-मलवडीत ७२ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:17 AM2021-05-04T04:17:49+5:302021-05-04T04:17:49+5:30
वरकुटे-मलवडी : ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, राज्यासह ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा कहर शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर रक्ताचा एकेक ...
वरकुटे-मलवडी : ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, राज्यासह ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा कहर शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर रक्ताचा एकेक थेंब महत्त्वाचा समजून माण तालुक्यातील वरकुटे-मलवडीतील साध्य फाउंडेशनच्या तरुणांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ७२ रक्तदात्यांनी रक्तदान करून, तमाम तरुणांंसमोर नवा आदर्श निर्माण केेला आहे.
शुक्रवार, दि. ३० रोजी वरकुटे-मलवडीतील मारुती मंदिरात सोशल डिस्टन्सचे पालन करून सामाजिक कार्यकर्ते बाबाराजे हुलगे यांच्या प्रयत्नातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदात्यांना यावेळी वाफेचे मशीन, सॅनिटायझर, मास्कचे वितरण करण्यात आले. यावेळी वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी, शेनवडीसह पंचक्रोशीतील ७२ तरुणांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत रक्तदान केले. याप्रसंगी आयकर आयुक्त सचिन मोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस राजूभाऊ जानकर, वरकुटे मलवडीचे सरपंच बाळकृष्ण जगताप, विनायक मासाळ, नारायण खरजे, शेनवडीचे माजी सरपंच संजय खिलारी, सागर खरात, भारत अनुसे आदी उपस्थित होते.